Pune Crime | नशेसाठी औषधांच्या 6 हजार गोळ्या वाढीव किंमतीला विकल्या; साई अरिहंत जनरीकच्या महावीर देसरडासह 34 भागिदारांवर गुन्हा (FIR) दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | नशेसाठी औषधांच्या (Drugs For Addiction) ६ हजार गोळ्या वाढीव किंमतीला विकुन त्याची बनावट बिले (Fake Documents Bills) तयार करुन शासनाची फसवणूक (Cheating Case) करणार्‍या मेडिकल दुकानदारावर (Medical Shop Owners In Pune) गुन्हा दाखल करण्यात आली. (Pune Crime)

 

याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे (Food And Drug Administration) औषध निरीक्षक सुहास सावंत (Suhas Sawant) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३८७/२२) दिली आहे. त्यानुसार वाघोली (Wagholi) येथील साई अरिहंत जनरीकचे (Sai Arihant Janrik) महावीर मनसुखलाल देसरडा Mahavir Mansukhlal Desarda (वय ३४) व त्यांच्याकडून औषध खरेदी करणारे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे औषध निरीक्षक असून त्यांनी वाघोली येथील साई अरिहंत जनरीक याच्याकडे जाऊन तपासणी केली
असता त्यांनी अल्प्रेक्स या ६ हजार गोळ्या अज्ञात लोकांना वाढीव किंमतीला विक्री केली.
बीडमधील न्यू विहान मेडिकल यांच्या नावे बनावट बिले तयार केली.
शासकीय अधिकार्‍यास बिलाची खोटी माहिती देऊन प्रशासनाची फसवणूक करुन दिशाभूल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अल्प्रेक्स या गोळ्या अतिशय स्वस्त असून ती प्रामुख्याने मानसिक आरोग्य, चिंता यासाठी डॉक्टरांकडून दिली जाते.
तिचा गैरवापर हा नशेसाठी होत असतो. त्यातूनच अशा प्रकारे बेकायदेशीरपणे अधिक किंमतीला विक्री केल्याची तक्रार देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pune Crime | 6,000 tablets of drugs for intoxication were sold at inflated prices; FIR filed against 34 partners including Mahaveer Desarada of Sai Arihant generic

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Fire News | सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील दुकानांना भीषण आग; तीन दुकाने आगीत भस्मसात

 

Sanjay Raut | फडणवीसांकडून ‘लाउडस्पीकर’ असा उल्लेख; संजय राऊत म्हणाले – ‘काय पिपाण्या, सनई चौघडे….’

 

Eknath Shinde | उद्धव ठाकरेंनी झेड सुरक्षा नाकारली का? शंभुराजे देसाईंच्या दाव्यावर CM एकनाथ शिंदे म्हणाले…