Pune Crime | खाद्य तेलाच्या व्यवहारात 8.5 कोटींचा अपहार; मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खाद्य तेलाचे भाव दररोज वाढत (Edible Oil Price Increase) आहे. त्यामुळे याच्या व्यवहारात मोठा पैसा व्यापार्‍यांना द्यावा लागत आहे. मार्केटयार्डमधील घाऊक व्यापार्‍याने खाद्य तेलाच्या ऑर्डरसाठी पैसे दिले असतानाही ऑर्डरप्रमाणे माल (Pune Crime) न पुरवता 8 कोटी 53 लाख 95 हजार 923 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी ट्रेड फॅक्टरीच्या भागीदारावर पोलिसांनी (Pune Police) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

याप्रकरणी यश नरेंद्र मित्तल Yash Narendra Mittal (वय -26, रा. मुकुंदनगर) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Marketyard Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राज ललित बोकरिया Raj Lalit Bokaria (रा. शितल प्लाझा, मॉडेल कॉलनी-Model Colony) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 12 ऑक्टोबर ते 8 नोव्हेबर 2021 मध्ये घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे खाद्य तेल व धान्याचे घाऊक व्यापारी असून त्यांचा मार्केटयार्ड मध्ये गाळा आहे. राज बोकरिया हा ट्रेड फॅक्टरीचा भागीदार (Trade Factory Partners) आहे. मित्तल यांनी खाद्य तेल खरेदीकरीता गेल्या वर्षी त्याला 8 कोटी 53 लाख 95 हजार 923 रुपये दिले. रक्कम मिळाल्यानंतरही बोकरिया याने ऑर्डरप्रमाणे खाद्य तेलाचा पुरवठा केला नाही. फिर्यादी यांनी दिलेली रक्कमही परत केली नाही. फिर्यादी यांनी अनेकदा रक्कम परत मागितल्यानंतरही त्याने पैसे न दिल्याने शेवटी मित्तल यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक नलवडे (API Nalwade) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 8.5 crore embezzlement in edible oil transactions; FIR at Market Yard Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sairat Fame Actor Arbaj Shaikh | सैराटमधील सल्याला पुण्यातील रिक्षावाल्यानं लुटलं ?, शिवीगाळ अन् मनस्ताप…

 

Maharashtra Rain Update | राज्यात पावसाचे थैमान ! आगामी 2 दिवस पावसाचा जोर कायम; अनेक जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

 

Nilesh Rane | ‘… तर केसरकरांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भांडी घासावीत’ – निलेश राणे