Pune Crime | तीन कोटी भांडवल देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला 80 लाखांचा गंडा, मुंबईतील तिघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | व्यवसायासाठी तीन कोटी रुपये भांडवल देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका व्यावसायिकाची (Professional) तब्बल 80 लाखाची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबईतील तिघांविरोधात अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

रवी गायकवाड (Ravi Gaikwad), संदीप रवी (Sandeep Ravi), अल्पेश पटेल Alpesh Patel (रा. मुंबई) अशी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत कर्वेनगर भागात राहणाऱ्या एका व्यावसायिकाने अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक इलेक्ट्रीक ठेकेदार (Electrical Contractor) आहेत. त्यांना मोठे काम मिळाल्याने त्यांना तीन कोटी रुपयांची गरज होती. फिर्यादी यांच्या ओळखीच्या व्यक्तीमार्फत आरोपींची ओळख झाली. आरोपींनी त्यांना व्यवसायासाठी तीन कोटी रुपये भांडवल देण्याचे आमिष दाखवले. परंतु सुरक्षा ठेव म्हणून 80 लाख रुपयांची मागणी आरोपींनी केली. व्यावसायिकाने पैसे दिल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना भांडवल उपलब्ध करुन दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलीस ठाण्यात धाव घेत तिघांविरुद्ध तक्रार केली.
पोलीस उपनिरीक्षक सपताळे (PSI Saptale) तपास करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 80 lakhs to a businessman on the pretext of giving
3 crore capital, FIR against three in Mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा