Pune Crime | पुण्याच्या कोंढव्यात 27 वर्षीय तरूणीचा दोघांकडुन विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात (Pune Crime) महिला अत्याचाराच्या घटना (women harassment cases) सुरुच असून, शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी महिला आत्याचाराचे गुन्हे (Pune Crime) दाखल होत आहेत. पुण्यातील कोंढवा परिसरात कामावरुन घरी जाणाऱ्या एका 27 वर्षाच्या तरुणीसोबत अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Kondhwa Police) दोन तरुणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

अक्षय बाळु जगताप Akshay Balu Jagtap (वय-26), आकाश लोंढे akshay londhe (वय-26 दोघे रा. भिमनगर वसाहत, मनिष पार्क शेजारी, कोंढवा खु.) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कोंढवा परिसरात राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa police station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.27) सायंकाळी साडेपाच्या सुमारास कौसर बाग (Kauser Bagh) येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी धुणीभांड्याची कामे करते.
सोमवारी सायंकाळी तरुणी काम संपवून घरी जात होती. त्यावेळी आरोपींनी तिला आडवले. तिच्याकडील मोबाईल हिसकावून घेऊन तोडला. तसेच तिच्यासोबत अश्लिल चाळे करुन तिचा विनयभंग (molestation case) केला. पीडित तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Pune Crime) फिर्याद दिली असून आरोपींवर 354, 354ड, 427, 323 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | A 27 year old girl was raped in Kondhwa, Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Bhavana Gawali | शिवसेना खा. भावना गवळी यांच्यावरील आरोपांशी सईद खानचा संबंध काय?, जाणून घ्या

Jayant Patil | ‘धनंजय मुंडेंना पुढच्या 10 निवडणुका कोणी हरवू शकत नाही’ – जयंत पाटील

Pune News | दत्तवाडी परिसरात पुन्हा पाणी पुरवठा सुरळीत चालू होईल; हंडा मोर्चा काही दिवसांसाठी मागे