Pune Crime | पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थेच्या सचिवाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल; खोटी सही करत करोडो रूपये लाटण्याचा होता डाव…

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime | पुण्यातील नामांकित भारतीय कला प्रसारिणी सभा या संस्थेच्या सचिवाविरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेचे विश्वस्त सुर्यकांत देसाई यांनी त्यांच्या विरूध्द तक्रार नोंदवली आहे. सदर तक्रारीमध्ये मुख्य आरोपी सोबत इतर ९ जणांचा समावेश आहे. मुख्य आरोपीसोबत संगनमत करत भारतीय कला प्रसारिणी सभा या संस्थेवर ताबा मिळवण्याच्या हेतूने मयत सचिवाच्या बनावट सह्या करून करोडो रूपये लाटण्याचा आरोपींचा हेतू होता असा आरोप तक्रारदार सुर्यकांत देसाई यांनी केला आहे. (Pune Crime)

 

ADV

आरोपींनी धर्मादाय आयुक्तांसमोर मयत सचिव भालचंद्र पाठक यांच्या बनावट सह्या करून संस्थेवर ताबा मिळवण्याच्या हेतूने काही कागदपत्रे जमा केली होती. तसेच त्यांनी संस्थेच्या मालकीची कोट्यावधी रूपयांची पाषाणरोड येथील जागा विक्री करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचा देखील आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

 

या जागेच्या व्यवहाराची कुणकुण लागल्यानंतर संस्था वाचविण्याच्या हेतूने संस्थेचे विश्वस्त अनिल देसाई यांनी यांनी सामाजिक कार्यकर्त्या तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेना पुणे जिल्हा समन्वयक मनीषा धारणे यांच्या मदतीने स्वारगेट पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. (Pune Crime)

संस्थेचे विश्वस्त अनिल देसाई यांनी स्वारगेट पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारी मध्ये म्हटले आहे की, सन २००७ मध्ये संस्थेचे माजी सचिव मयत भालचंद्र पाठक यांच्या ४१ (अ) अर्जानुसार तत्कालीन सह धर्मादाय आयुक्त पुणे यांनी कारभार सोपवला होता. तसेच २०१५ पासून भालचंद्र पाठक यांना आजारपणामुळे संस्थेच्या कामकाजावर लक्ष देणे शक्य नव्हते तसेच त्यांच्या आजारपणामुळे त्यांना कोणत्याही कागदावर सही करता येणे शक्य नव्हते याच संधीचा फायदा मुख्य आरोपी पुष्कराज पाठक याने व त्याच्या कुटुंबातील इतर सात सदस्यांनी संगनमत करून ‘भारतीय कला प्रसारिणी सभा’ या संस्थेची कोट्यावधी रूपयांची मालमत्ता लाटण्याच्या हेतूने सचिव भालचंद्र पाठक यांची बनावट सही करून सह- धर्मादाय आयुक्त पुणे यांच्याकडून बेकायदेशीररित्या स्वतःची सचिव तसेच कुटुंबातील इतर व्यक्तींसह एकूण १८ जणांची नावे आश्रयदाता म्हणून मंजूर करून घेतली.

 

या १८ सदस्यांची कुठल्याही आवक रजिस्टरमध्ये नोंद न करता तसेच कुठलीही पडताळणी न
करता केवळ झेरॉक्स प्रतिंच्या आधारे आरोपीने सह-धर्मादाय आयुक्तांकडून निकाल आपल्या बाजुने मिळवला.
आरोपीला असा कुठलाही अधिकार नसताना त्याने बेकायदेशीररित्या संस्थेची तसेच शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आरोपींमध्ये पुष्कराज पाठक याच्यासह आरती भालचंद्र पाठक, आश्विनी अ. पाठक, पुनम अ. पाठक,
जयदीप विठ्ठलराव लडकत, रामचंद्र पिसे, गौरव दिवेकर, कांतीलाल ठाणगे आदिंची नावे समाविष्ट आहेत.
यातील आरोपी जयदीप विठ्ठलराव लडकत हा या संस्थेचा माजी अध्यक्ष असून
त्याच्या विरोधात वानवडी पोलिस स्थानकात सख्या भावाची १ कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

 

तसेच या प्रकरणाबाबत संबंधितांवर कारवाई करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा धारणे यांनी केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | A fraud case was filed against the secretary of a reputed educational institution in Pune; The plan was to steal crores of rupees by forging signatures…

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP Protest | राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर भव्य मोर्चा

Disha Salian Case | दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; अधिवेशनात फडणवीसांची घोषणा

IPS Rashmi Shukla | रश्मी शुक्ला प्रकरणावरून अजित पवार विधानसभेत आक्रमक