Pune Crime | रेल्वे पोलिसांच्या कोठडीत आरोपीचा मृत्यू ! पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | चोरीच्या (Theft) आरोपाखाली अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचा रेल्वे पोलिसांच्या (Railway Police) कोठडीत मृत्यू (Custody Death) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नागेश रामदास पवार Nagesh Ramdas Pawar (वय-29 रा. हडपसर, मुळ रा. मोहोळ, जि. सोलापूर) असे मृत्यू झालेल्या आरोपीचे (Pune Crime) नाव आहे.
रेल्वे पोलिसांनी नागेश पवार याला 16 ऑगस्ट रोजी चोरीच्या आरोपावरुन ताब्यात घेतले होते. त्याला 17 ऑगस्ट रोजी न्यायालयात (Court) हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला 25 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली होती. दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी तो आजारी पडल्यामुळे त्याला उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.(Pune Crime)
नागेश पवार याच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक संतप्त झाले आहेत.
नागेशचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
या घटनेला पोलिसच जबाबदार असून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा (FIR) दाखल करण्याची मागणी पवारच्या नातेवाईकांनी केली आहे.
Web Title :- Pune Crime | accused dies after being beaten up by police in police custody in pune railway police
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Leopard in Pune | पुण्यातील विश्रांतवाडीतील DRDO संस्थेत बिबट्याचा वावर ?, परिसरात प्रचंड खळबळ