Pune Crime | एटीएम मशीनवर दरोड्याचा प्रयत्न, परप्रांतीय टोळीला कोंढवा पोलिसांकडून अटक; 5 गुन्हे उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील कोंढवा, हांडेवाडी, मोहम्मद वाडी भागात मध्यरात्री एटीएम मशीनवर (ATM Machine) दरोड्याचा प्रयत्न (Attempted Robbery) करणाऱ्या परप्रांतीय टोळीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी (Pune Police) दोन जणांना अटक (Arrest) केली असून त्यांच्याकडून कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) दाखल असलेले पाच गुन्हे उघडकीस (Pune Crime) आले आहे.

 

रोहित रामखिलावन मश्रा (वय-24 मुळ रा. मझगाव, पो. स्टे. सारसवाडी, जि. उमरिया, सध्या रा. कोंढवा बु.), शिवम ओमकार तिवारी (वय-19 रा. हरसम्हार पो.स्टे. अरिबपुर, उत्तर प्रदेश) यांना अटक केली आहे. तर त्यांचे साथीदार शिवम सोनी आणि वाल्मिकी शुक्ला (रा. उत्तरप्रदेश) हे फरार आहेत. रोहित मिश्रा याला एनआयबीएम रोड (NIBM Road) तर शिवम याला गुजरात (Gujarat) मधून अटक केली आहे. कोंढवा (Kondhwa), हांडेवाडी (Handewadi), मोहम्मदवाडी (Mohammadwadi) भागात एटीएम मशीन फोडून चोरीचा प्रयत्न करणारी टोळी सक्रिय झाली होती. (Pune Crime)

 

टोळीने पुणे शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra), फायनान्स बँक (Finance Bank), आय.सी.आय.सी. आय. (ICICI Bank), पंजाब नॅशनल बँके (Punjab National Bank) चे एटीएम मशीन फोडून त्यातील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बँकेच्या सीसीटीव्ही सर्व्हेलन्स व पोलिसांच्या गस्तीमुळे या टोळीचा प्रयत्न पाच ते सहा वेळा फसला होता. याप्रकरणी तांत्रिक विश्लेषण द्वारे दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीची माहिती पोलीस अंमलदार अमोल हिरवे (Amol Hirve), गणेश चिंचकर (Ganesh Chinchkar), निलेश देसाई (Nilesh Desai) यांना मिळाली. त्यानुसार कारवाई करुन पोलिसांनी दोघांना अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil),
सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील (Senior Police Inspector Sardar Patil),
पोलीस निरीक्षक गुन्हे जगन्नाथ जानकर (Police Inspector Jagannath Jankar),
पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले (Police Inspector Sanjay Mogle)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे (API Anil Suravse), पोलीस हवालदार अमोल हिरवे, पोलीस शिपाई गणेश चिंचवकर, पोलीस नाईक निलेश देसाई, रत्नपारखी, रासगे, जडे, राठोड, भोसले, मोरे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | ATM machine robbery attempt, foreign gang arrested by Kondhwa police; 5 Crimes Revealed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Champa singh Thapa | बाळासाहेबांच्या ‘सावली’नेही सोडली उद्धव ठाकरेंची साथ, ‘मातोश्रीचा सेवक’ शिंदे गटात

Pune News | अतिवृष्टी नुकसानीपोटी 3 कोटी 18 लाखांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त

CM Eknath Shinde | आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघात नवरात्रोत्सवाच्या स्वागत कमानींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर