Pune Crime | पत्नीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न; वानवडीत संदीप घुले विरुद्ध FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दागिने (Jewelry) बँकेत गहाण ठेवून त्यावर कर्ज (Loan) काढल्याबद्दल विचारणा केल्याच्या कारणावरुन पतीने पत्नीचा गळा दाबून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) संदीप शिवाजीराव घुले Sandeep Shivajirao Ghule (वय ५१, रा. वानवडी) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार वानवडीतील परमार पार्क सोसायटीत (Parmar Park Society, Wanwadi) मंगळवारी दुपारी घडला.

 

याप्रकरणी योगिता संदीप घुले Yogita Sandeep Ghule (वय ४७, रा. वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३७०/२२) दिली आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे पतीपत्नी आहेत.
घुले यांची वाईन शॉपचे (Wine Shop) दुकान आहे. त्यांचा १९९७ मध्ये विवाह झाला आहे.
संदीप घुले यांनी पत्नीचे दागिने बँकेत गहाण ठेवून त्यावर कर्ज काढले होते.
त्याबाबत फिर्यादी यांनी विचारणा केली. तेव्हा त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन मारहाण (Beating) केली.
तसेच मंगळवारी दुपारी त्यांना बेडरुममध्ये नेऊन गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलीस उपनिरीक्षक गायकवाड (Sub-Inspector of Police Gaikwad) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Attempt to kill wife by strangulation;
FIR against sandeep shivajirao ghule in wanwadi police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा