Pune Crime | ‘आम्हीच इथले भाई, नादाला लागला तर खल्लास करु’, वाढदिवसाच्या कार्यक्रमात नाचताना खुन्नस दिल्याने टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मुलाच्या वाढदिवसाच्या (Birthday) कार्यक्रमात नाचताना खुन्नस दिल्याचा राग मनात धरुन टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. या प्रकरणी (Pune Crime) भारती विद्यापीठ पोलीस (Bharti Vidyapeeth Police Station) ठाण्यात 8 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन दोघांना अटक (Arrest) केली आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

याप्रकरणी सुनिल महादेव पांडव Sunil Mahadev Pandav (वय 19, रा. संतोषनगर, कात्रज-Katraj) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन ईशान शेख (Ishaan Shaikh), अमिन मुल्ला (Amin Mulla), जावेद मेहबुब मुल्ला Javed Mehboob Mulla (वय 27), अझर ऊर्फ अझरुद्दीन शेख (Azhar alias Azharuddin Shaikh) , प्रतिक काची (Pratik Katchi), शेखर ठोंबरे (Shekhar Thombre), तौफिक लाला शेख Tawfiq Lala Sheikh (वय 29, सर्व रा. संतोषनगर, कात्रज) व त्यांच्या इतर एका साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यातील जावेद मुल्ला व तौफिक शेख यांना अटक केली आहे. ही घटना कात्रजमधील संतोषनगरमधील गणपती मंदिराजवळ बुधवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल पांडव यांचे मित्र सार्थक कुलकर्णी (Sarthak Kulkarni) यांच्याबरोबर संतोष मोरे (Santosh More) यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. आरोपीही या वाढदिवसाला आले होते. तेथून ते परत जात असताना ईशान शेख व अमिन मुल्ला यांनी फिर्यादी व त्यांचा मित्र सार्थक यांचा रस्ता अडविला. ‘तू मला नाचताना खुन्नस का दिली’ असे बोलून त्यांनी सार्थक याच्य डोक्यात पाठीवर, कमरेवर, दोन्ही हातावर व उजव्या गुडघ्यावर कोयत्याने वार करुन जखमी केले. इतर आरोपींनी काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ईशान शेख व अमिन मुल्ला यांनी हातील काठी, कोयता हवेमध्ये फिरवीत ‘आम्हीच इथले भाई आहोत, आमच्या नादाला लागला तर खल्लास करुन टाकू’, अशाप्रकारे लोकांना धमकाविले. तेथील रिक्षा व चारचाकी गाड्यांवर दगडफेक करुन त्यांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. सहायक पोलीस निरीक्षक घावटे (API Ghavte) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Attempt To Murder Case Bharti Vidyapeeth Police Station Crime News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eknath Khadse | राजकारणात इतिहासजमा झाले म्हणणाऱ्यांना एकनाथ खडसेंचे उत्तर; म्हणाले…

 

Tata Group च्या ‘या’ स्टॉकमध्ये मिळू शकतो 41% शानदार रिटर्न; दमदार बिझनेस आऊटलुकवर BUY रेटिंग; पहा टार्गेट

 

PM Kisan e-KYC | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM किसानची e-KYC करण्यासाठी मुदत वाढवली; जाणून घ्या