Pune Crime | पोलिसाच्या डोळ्यात स्प्रे मारुन चाकूने हल्ला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पोलिसांनी एका सोनसाखळी चोरट्याचा (Gold chain thief) पाठलाग करुन त्याला अटक केली. आपण पकडले जाऊ नये, यासाठी चोरट्याने पोलिसांच्या डोळ्यावर स्प्रे मारुन चाकूने हल्ला (Attempt to Murder) केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील (Pune Crime) पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात घडली आहे. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.29) सकाळी साडेसातच्या सुमारास निगडी प्राधिकरण (nigdi pradhikaran) येथे घडला आहे.

 

याप्रकरणी पोलीस हवालदार सतीश जालिंदर ढोले Satish Jalindar Dhole (वय-42) हे जखमी झाले आहेत. त्यांनी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi police station) फिर्याद दिली आहे. राजू खेमू राठोड (वय-39 रा. उजनी, एकंबी, ता. औसा, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. निगडीमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांकडून हद्दीत गस्त घातली जात आहे. याच दरम्यान ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू राठोड सोनसाखळी चोरून पळून जात असल्याचा संशय पोलीस हवालदार ढोले यांना होता. त्यामुळे ढोले यांनी आरोपीचा पाठलाग केला. त्यावेळी राजूने आपण पकडले जाऊ नये यासाठी ढोले यांच्यावर चाकूने वार (Pune Crime) केला. या दरम्यान पोलीस कर्मचारी राकेश हगवणेही (Rakesh Hagwane) त्याठिकाणी आले. आरोपीने त्यांच्यावरही चाकूने वार केले आणि तेथून पळून गेला. या घटनेची माहिती तात्काळ चेन स्नॅचिंग विरोधी पथकाला (anti-chain snatching squad) कळवण्यात आली. तसेच आरोपीचे वर्णन सांगण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Attempt to Murder of Policeman in nigdi pradhikaran pimpri chinchwad area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Supreme Court | ‘कोणतेही डॉक्टर आपल्या रूग्णाला जीवनाची खात्री देऊ शकत नाहीत’ – सर्वोच्च न्यायालय

Yamini Malhotra | ‘गुम हे किसीके प्यार मे’मधल्या ‘या’ अभिनेत्रीनं केलं टॉवेलवर फोटोशूट, फोटो व्हायरल

Omicron Variant | ‘नायजेरिया’तून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या दोघांना कोरोनाची लागण; महापालिका प्रशासन अलर्ट

Maharashtra Rains | राज्यात पुढील 3 दिवसांत ‘या’ 8 जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस, IMD चा अंदाज

Bombay High Court | ‘जोपर्यंत वडील जिवंत आहेत, तोपर्यंत मुलीला मालमत्तेत हिस्सा मिळणार नाही’ – मुंबई उच्च न्यायालय