Omicron Variant | ‘नायजेरिया’तून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या दोघांना कोरोनाची लागण; महापालिका प्रशासन अलर्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Omicron Variant | दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) या भयावह विषाणूने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. या विषाणुच्या धोक्याचा विचार करता केंद्र सरकारने (Central Government) सावधानतेच्या सुचना सर्व राज्यांना दिल्या आहेत. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर लक्षकेंद्रित केल असतानाच काल (मंगळवारी) आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण (Corona positive) झाली. तर, आता पिंपरी चिंचवड (PCMC) शहरात नायजेरियातून (Nigeria) आलेल्या दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे.

 

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात नायजेरियातून (Nigeria) आलेले 2 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, कोरोनाचा नवा ओमायक्रॉन व्हेरिएंट असलेल्या 12 देशामध्ये नायजेरियाचा समावेश नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. असं देखील महापालिका प्रशासनाकडून (PCMC administration) सांगण्यात आलं आहे. (Omicron Variant)

नायजेरियातून आलेल्या त्या दोघांना जिजामाता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. त्यामध्ये ओमायक्रॉन हा नवा विषाणू आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने जिनियन सिक्वेन्सला (Genius Sequence) तपासासाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, नायजेरियातून 25 नोव्हेंबर रोजी पिंपरी- चिंचवड शहरात आई आणि मुलगी आल्या होत्या. त्यादिवशीही दोघांनी केलेली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. तर, महापालिकेने 29 नोव्हेंबरला केलेली टेस्ट पॉझिटिव्ह आलीय. त्यानंतर त्यांचा मुलगा देखील पॉझिटिव्ह (Corona positive) आला आहे. त्यामुळे आता पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन अलर्ट झाले आहे.

 

Web Title :- Omicron Variant | two people nigeria who came pimpri chinchwad are corona positive pcmc Administration Alert

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Bombay High Court | ‘जोपर्यंत वडील जिवंत आहेत, तोपर्यंत मुलीला मालमत्तेत हिस्सा मिळणार नाही’ – मुंबई उच्च न्यायालय

Petrol Price | केजरीवाल सरकारकडून दिल्लीकरांना मोठा दिलासा ! पेट्रोल 8 रूपयांनी स्वस्त, महाराष्ट्रात ठाकरे सरकारकडून अद्याप निर्णय नाही

Pune Crime | हिंजवडीतील एकाने लावला Flipkart आणि ‘डिलिव्हरी डॉट कॉम’ला सव्वा लाखांचा चुना; ‘मोडस” पाहून पोलीस ‘अवाक’

Shehnaaz Kaur Gill | सिद्धार्थच्या वाढदिवसाच्या काही दिवस आधीच शहनाज पोहचली ‘अनाथ आश्रम’मध्ये, चाहत्यांनी केलं कौतुक, म्हणाले…