Pune Crime | पूर्ववैमनस्यातून दोघा भावांवर तलवारीने वार करुन खुनाचा प्रयत्न; हडपसर परिसरातील घटना

पुणे : Pune Crime | दुपारी झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरुणावर दोघा भावांवर तलवारीने व फरशीने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Pune Crime) केला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तिघांना हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) अटक केली आहे.

आकाश रवी सरोदे (वय २२), सुदर्शन रामु जाधव (वय १९, रा. सुखकर्ता कॉलनी, फुरसुंगी) आणि अमोल ऊर्फ सागर मल्हारी भिसे (वय २०, रा. फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या ४ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समीर भिमाशंकर नरळे (वय २२, रा. मंगेश तुपे चाळ, कावळेवस्ती) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांच्याबरोबर फिर्यादी व त्यांच्या मित्रांची दुपारी भांडणे झाली होती. त्यानंतर फिर्यादी व त्यांचा मित्र विशाल गायकवाड व त्यांचा भाऊ गणेश हे शेवाळवाडी मार्केटमागील कॅनॉलचे रोडवरुन जात असताना या टोळक्याने त्यांना अडविले.

टोळक्याने विशाल व गणेश यांच्यावर तलवारीने डोक्यावर, पाठीवर व हातावर वार करुन जबर
जखमी केले. तसेच फरशीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हडपसर
पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा केला असून तिघांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक अडागळे तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

ATM Fraud | ATM फ्रॉडपासून बचाव करण्यासाठी ‘या’ गोष्टी ठवा लक्षात, होणार नाही फसवणूक, जाणून घ्या

Mumbai Corona | एप्रिल 2020 च्यानंतर मुंबईत समोर आली एका दिवसातील कोरोनाची सर्वात कमी प्रकरणे, जाणून घ्या

IND vs ENG | Jasprit Bumrah-Mohammed Shami ने इंग्लंडला असा दिला धक्का, वेगवान फलंदाजीने मॅचला दिली कलाटणी

Fuel Price | अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले, अखेर का कमी केल्या जात नाहीत इंधनाच्या किमती, हे आहे कारण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | attempt to murder of two brother in hadapsar area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update