Pune Crime | हॉटेल ‘गारवा’मुळे व्यवसाय होत नसल्याने ‘अशोका’चे मालक खेडेकरकडून आखाडेंच्या खूनाची सुपारी; 8 जणांना अटक, मारेकर्‍यांना दाखवलं होतं ‘हे’ आमिष

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे-सोलापूर रस्त्यावर (Pune-Solapur Highway) असलेल्या हॉटेल गारवामुळे त्याच्या शेजारच्या अशोका हॉटेलचा (Hotel Ashoka) व्यवसाय होत नव्हता. त्यामुळे अशोका हॉटेलच्या चालकांनी एका सराईत गुन्हेगाराला सुपारी देवून हॉटेल गारवाचे मालक (Garva Owner) रामदास आखाडे (Ramdas Akhade) यांचा खून (Murder) केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. खून करण्यासाठी आरोपींना दररोज एक ते दोन हजार रुपये देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) आठ जणांना अटक केली आहे. उपचारादरम्यान हॉटेल चालकाचा मृत्यू झाल्याने हल्लेखोर आणि साथीदाराविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब जयवंत खेडेकर Balasaheb Jaywant Khedekar (वय 56), निखिल बाळासाहेब खेडेकर Nikhil Balasaheb Khedekar (वय 24), सौरभ ऊर्फ चिम्या कैलास चौधरी
Saurabh alias Chimaya Kailas Chaudhary (वय 21), अक्षय अविनाश दाभाडे Akshay Avinash Dabhade (वय 27) करण विजय खडसे Karan Vijay Khadse (वय 21), प्रथमेश राजेंद्र कोलते At first Rajendra Kolte (वय 23), गणेश मधुकर साने Ganesh Madhukar Sane (वय 20) आणि निखिल मंगेश चौधरी Nikhil Mangesh Chaudhary (वय 20, सर्व रा. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

 

व्हिडीओ पाहण्यासाठी आवश्य पोलीसनामाच्या फेसबुक पेजला भेट द्या (Watch Video On Policenama Facebook Page. Just Click Here)

रामदास रघुनाथ आखाडे Ramdas Raghunath Akhade (वय 38, रा. जावजी बुवाची वाडी, ता. दौंड Daund) असे मृत्यू झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे.
बाळासाहेब खेडेकर व त्याचा मुलगा निखिल यांचे आखाडे यांच्या गारवा हॉटेल (Hotel Garva) शेजारी अशोका नावाचे (Hotel Ashoka) हॉटेल आहे.
आखाडे यांच्या हॉटेलमुळे खेडेकर यांच्या हॉटेलचा व्यवसाय होत नव्हता.
त्यामुळे बाळासाहेब खेडेकर (Balasaheb Khedekar) याने त्याचा भाचा सौरभ चौधरी याला आखाडे याचा खून करण्यास सांगितले.
आखाडे यांचा खून केल्यास तुला दररोज एक ते दोन हजार रुपये देवू असे खुनाच्या दोन महिने आधी खेडेकर बाप-लेकाने चौधरी याला सांगितले होते.
त्यानुसार चौधरी याने त्याचा साथीदार नीलेश मधुकर आरते व इतर साथीदारांच्या मदतीने आखाडे यांचा खून केल्याची माहिती गुरुवारी सरकारी वकील संजय दिक्षीत (Public Prosecutor Sanjay Dixit) यांनी न्यायालयास दिली.

 

काय आहे प्रकरण :

आखाडे यांचे सोलापूर रस्त्यावरील उरुळी कांचन (uruli kanchan) परिसरात गारवा नावाचे हॉटेल (Hotel Garva) आहे.
रविवारी (ता.१८) ते सायंकाळी पावणेसातच्या सुमारास उपाहारगृहासमोर खुर्ची टाकून बसले होते.
त्या वेळी हल्लेखोर आणि त्याच्याबरोबर असलेला साथीदार दुचाकीवरून तेथे आले.
काही कळायच्या आत एका हल्लेखोराने त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांचा खून केला.

हॉटेल गारवाचा (Hotel Garva) चा रोजचा दोन ते अडीच लाखांचा व्यवसाय :
सोलापूर रस्त्यावर अशोका व गारवा हे दोन्ही हॉटेल शेजारी-शेजारी आहे.
गारवाचा रोजचा व्यवसाय हा दोन ते अडीच लाख रुपये तर अशोकाचा व्यवसाय साधारण ५० ते ६० हजार रुपये होते.
ज्या-ज्या वेळी हॉटेल गारवा काही निमित्ताने बंद असते त्या-त्या वेळी अशोकाचा व्यवसाय अडीच ते तीन लाख रुपयांचा होता.
त्यामुळे गारवा हॉटेल कायमचे बंद पडले तर आपला व्यवसाय वाढेल या विचाराने आरोपींनी खुनाचा कट केल्याचे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे.
लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकोशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस उपनिरीक्षक दादाराजे पवार (Police Sub Inspector Dadaraje Pawar) या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | Balasaheb Jaywant Khedekar, the owner of Hotel Ashoka give order to kill Ramdas Akhade owner of hotel garva, lonikalbhor police arrested 8 persons in murder case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IRCTC News : आता ऑनलाइन रेल्वे तिकिट बुकिंगपूर्वी करावे लागेल मोबाइल आणि ईमेल व्हेरिफिकेशन; जाणून घ्या

Pune Crime | कोंढवा पोलिसांकडून पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या भाजपच्या माजी नगरसेवक विवेक यादवला गुजरात बॉर्डरवरून अटक

Earthquake | बिकानेरमध्ये 24 तासात दुसर्‍यांदा भुकंपाचे झटके; पाकिस्तान होता केंद्रबिंदू, जीवितहानीचे अद्याप वृत्त नाही

Pimpri Crime | नवर्‍याबरोबर ठेवतेस तसे माझ्याबरोबरही संबंध ठेव; सासर्‍याने केली सुनेकडे शरीरसुखाची मागणी