Pune Crime | पती-पत्नीतील भांडणात रस्त्यावरील वाहनांची केली तोडफोड; पुण्याच्या बोपोडीत जावयाचा ‘धिंगाणा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पती-पत्नीमधील भांडणांमुळे पत्नी माहेरी येऊन राहिली. त्यामुळे चिडलेल्या जावयाने आपल्या साथीदारांना घेऊन आपल्या सासरच्या घरावर दगडफेक केली. त्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. हा प्रकार बोपोडीतील गुरव चाळ येथे शनिवारी मध्यरात्री दीड वाजता (Pune Crime) घडला.

 

याप्रकरणी विजय टिळेकर (वय ४५, रा. गुरव चाळ, बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी साहील मोरे, अभिजित कांबळे व इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. साहील मोरे हा फिर्यादी यांचा जावई आहे. त्यांचे व फिर्यादी यांची मुलगी यांच्यात वाद सुरु असल्याने त्यांची मुलगी माहेरी येऊन राहत आहे. साहील मोरे हा आपल्या साथीदारांना घेऊन फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने शिवीगाळ करुन ते रहात असलेल्या घरावर दगडफेक केली.

 

साहील मोरे याने त्याच्या हातातील पालघन व अभिजित कांबळे याने त्याच्याकडील कोयत्याने तेथे उभ्या असलेल्या चारचाकी गाड्यांचे काचेवर मारुन गाड्यांच्या काचा फोडून नुकसान करुन ते निघून गेले. खडकी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक साळवी तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Bopodi Crime News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा