खूनासह गंभीर गुन्हयात वर्षभरापासून फरार असलेल्याला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   खूनासह गंभीर गुन्ह्यात गेल्या एक वर्षापासून पसार असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. किरण शिंदे (रा. नर्हे, सिहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

गेल्या वर्षी २०१९ मध्ये हिंगणे खुर्द येथे राहणाऱ्या चेतन पांडुरंग टेंबे यांना ओळखीचा आरोपी बंटी पवार, किरण शिंदे व त्याचे इतर साथिदार यांनी विरोधी गटासोबत फिरत होता. या रागातून आरोपीनी मारहाण करत चेतन देबे याच्या डोक्यात कोयत्याने वार करत त्याला जखमी केले. यानंतर पोलिसांनी काहीजणांना पकडले. परंतु किरण हा गेल्या वर्षभरापासून फरार होता.

दरम्यान युनिट एकचे पथक या भागात पेट्रोलिंग करत असताना किरण हा दत्तनगर येथे असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता, यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली. या आरोपींवर यापूर्वी नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील फनटाईग मॉल येथे रोहन साळवे याचा कोयत्याने खुन केल्याचा गुन्हा सिंहगड रोड पोस्टे येथे दाखल आहे. त्या गुन्ह्यात तो सध्या जामिनावर आहे. सदर आरोपीवर विविध पोलिस स्टेशनमध्ये विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, कर्मचारी अमोल पवार, पैभव स्वामी रिजवान जिनेडी, तुषार खडके, बाबा चव्हाण, अजय थोरात यांनी ही कामगिरी केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like