हस्तीदंताची तस्करी करणारा परप्रांतीय अटकेत, इतर प्राण्यांचेही तीन हस्तीदंत जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – स्वारगेट परिसरात हस्तीदंताची विक्री करण्यासाठी आलेल्या एका परप्रांतीयाला गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून लाखो रुपयांचे तीन हस्तीदंतासह इतर प्राण्यांचे तीन दंत जप्त करण्यात आले. मागील काही दिवसांपुर्वी पोलिसांनी ८० लाखांचे चार हस्तीदंत जप्त करण्यात आले होते.  भीमा चव्हाण असे अटक केलेल्याचे नाव आहे.

 

पोलीस उपायुक्त गुन्हे , बच्चन सिंग यांनी पोलीसनामाला दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर शहरातील विविध भागात पोलिसांकडून पेट्रोलिंग, कोंम्बिग ऑपरेशन सुरु आहे. दरम्यान, हद्दीतील सराईताचा शोध घेताना, स्वारगेट परिसरात हस्तीदंत विक्रीसाठी एकजण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस नाईक मोहसीन शेख व यशवंत खंदारे यांना त्यांचे बतमीदारामार्फत बातमी मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून भीमाला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीची झडती घेतली असता,त्यामध्ये तीन फूट लांबीचा कोरीवकाम केलेला एक हस्तीदंत आणि दीड फूट लांबीचा पुरुषांच्या चेहऱ्याची प्रतिकृतीचे कोरीवकाम केलेले तीन मोठ्या आकाराचे हस्तीदंत तसेच इतर प्राण्यांचे तीन दंत मिळून सात मोठे हस्तीदंत, तीन लहान दंत जप्त करण्यात आले आहेत. एकुण १० दंताचा समावेश आहे. त्यामध्ये मागील काही दिवसांपुर्वी ८० लाख रुपये किंमतीचे चार हस्तीदंत जप्त करण्यात आले होते.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, गुन्हे , सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, पोलीस निरीक्षक गजानन पवार, सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस उपनिरीक्षक नीलेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे, यशवंत खंदारे, मोहसीन शेख, ऊसुलकर , जाधव, भिलारे, गायकवाड, कादिर शेख, मीतेश चोरमले, फरांदे, स्वप्निल कांबळे, गोपाळ मदने, जाधव यांच्या पथकाने केली.

Visit : Policenama.com