Pune Crime Branch Police | बहुचर्चित सेक्स रॅकेट प्रकरणातील फरार नेपाळी शिवा एजंटला पुण्याच्या गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील बाहुचर्चित आणि जिल्हाभर गाजलेल्या सेक्स रॅकेट प्रकरणातील फरार नेपाळी शिवा एजंटच्या मुसक्या आवळण्यात पुण्याच्या गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) पथकांना यश आले आहे. तो गेल्या चार वर्षांपासून फरार झाला होता. या सेक्स रॅकेट प्रकरणात तत्कालीन अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालत मोक्का कारवाई केली होती. या प्रकारणाने मात्र शहर पोलीस दलातील भल्याभल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते. त्याच्यासोबत काही जणांचेे संबंध असल्याची चर्चा त्यावेळी होती. pune crime branch police arrest Shiva Agent alias Shiva Ramkumar Chaudhary in yerwada police station case

शिवा एजंट उर्फ शिवा रामकुमार चौधरी Shiva Agent alias Shiva Ramkumar Chaudhary (वय 37, रा. नेपाळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) 2017 मध्ये गु. र. नं. 757/2017 PITA 3,4,5 नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मोक्कानुसार कारवाई केली होती.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पुण्यातलं हे हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट पुण्यासह मुंबई, नेपाळ, पालघर, ओरिसा, आसाम , पश्चिम बंगाल या शहरातील व्यक्ती चालवत होते. या सेक्स रॅकेटच मोठं काम चालत आसल्याचे आता खासगीत सांगितले जाते. दरम्यान त्यावर कारवाई देखील होत नसत. झालीच तर तेही छा-छु असायची, असे आता सांगितले जाते. दरम्यान तत्कालीन अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना हे प्रकरण समजले. त्यांनी त्याची इंतभूत माहिती गोळा केली आणि वेगळी पथके पाठवून त्यावर कारवाई केली.

त्यानंतर पोलीस दलातच मोठी खळबळ उडाली होती. कारवाईने त्यावेळी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या व त्याचा मलिदा मिळणाऱ्या सर्वांचेच धाबे दणाणले होते.
मोक्काची कारवाई केली जाणार असल्याचे लक्षात येताच प्रचंड खळबळ माजली होती.
या कारवाईत तबल 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच तपासात आणखी आरोपी निष्पन्न झाले आहेत. प्रथमच सेक्स रॅकेटवर इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाली होती.

विशेष म्हणजे हे चालक, पिंटू मॉरिश, राजू, शिवा एजंट, अश्या नावाने पुण्यात प्रसिद्ध होते. या टोळीचा म्होरक्या हा पालघरचा कृष्णा सिंग सुरेंद्र सिंग (वय 44) हा होता.
पोलिसांनी यातील 17 ते 18 जणांना अटक केली आहे.
पण, आणखीही 10 ते 11 जण फरार असल्याचे कळते.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

दरम्यान शिवा एजंट हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता.
तो नेपाळला गेल्याचे समोर आले होते. त्यानंतर तो परत पुन्हा पुण्यात आला नव्हता. मात्र पोलीस त्याच्या मागावरच होते.
उपनिरीक्षक विजय झंजाड यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिवा एजंट हा सुरत याठिकाणी मित्राकडे आला आहे. त्यानुसार या माहितीची खातरजमा करण्यात आली.
त्यानंतर पथकाने सुरत येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला पकडले. शिवा एजंट हा नेपाळी मुली पुण्यात पुरविण्याचे काम करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे (additional commissioner of police ashok morale),
उपायुक्त श्रीनिवास घाडगे (deputy commissioner of police shriniwas ghadge),
सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे (assistant commissioner of police laxman borate) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (senior police inspector balaji pandhre) , उपनिरीक्षक विजय झंजाड (Police sub inspector vijay zanjad),
श्रीकांत चव्हाण, पोलीस अमंलदार प्रदीप शितोळे, प्रवीण पडवळ, बापू भोसले, विजय गुरव, संपत अवचरे, विनोद साळुंके, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर,
अमोल पिलाने, प्रदीप गाडे, सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे, मोहन एलपल्ले, चेतन शिरोळकर, काशीनाथ परदेशी, रुपाली कर्णवर पथकाने केली आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : pune crime branch police arrest Shiva Agent alias Shiva Ramkumar Chaudhary
in yerwada police station case

हे देखील वाचा

Pune Crime Branch Police | वाहन चोरी प्रकरणातील संशयित दाम्पत्यानं गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍याच्या हाताचा घेतला चावा

Retirement च्या नंतरसुद्धा EPF खात्यावर मिळू शकते व्याज !
ते सुद्धा विना कॉन्ट्रीब्यूशन,जाणून घ्या कधी आणि कसे?

Pune Crime News | कुख्यात तडीपार गुंड पप्पू वाडेकरचा खून, पुणे जिल्ह्यात खळबळ

Pritam Munde | प्रीतम मुंडेंना डावलल्याचा भाजपला मोठा फटका,
बीडमध्ये 2 दिवसांत 74 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

MP Sudhir Gupta on Amir Khan | आमिर खानवर BJP खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य,
म्हणाले – ‘आजोबाच्या वयात तिसरी पत्नी शोधतोय, हा अंडी विकण्याच्या लायक’