Pune Crime Branch | कार बाजारातून कार चोरणारे गुन्हे शाखेकडून गजाआड, 10 लाख 50 हजाराच्या दोन कार जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Branch | अंधाराचा फायदा घेऊन हडपसर येथील कार बजार (Car Bazar Hadapsar) दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील चावी घेऊन दोन कार चोरून नेल्या (Motor Vehicle Theft). ही घटना 31 मार्च रोजी घडली होती. चोरट्यांनी दहा लाख 50 हजार रुपये किमतीच्या दोन कार चोरुन नेल्या होत्या. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाच च्या पथकाने एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर एकाला अटक केली आहे. पोलिसांनी 24 तासात गुन्हा उघडकीस आणून आरोपींची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.

सोलापूर रोडवरील (Pune Solapur Road) शंकर मठाजवळ (Shankar Maharaj Math) असलेल्या चिंतामणी मोटर्स दुकानाचा दरवाजा तेडून चोरट्यांनी दहा लाख 50 हजार रुपये किमतीच्या बलेनो व स्विफ्ट कार चोरुन नेल्या. हा प्रकार रविवारी रात्री सात ते सोमवारी सकाळी दहाच्या दरम्यान घडला. याबाबत रिजवान अमीरुद्दीन शेख (वय-43 रा. नानापेठ, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्य़ाद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला.

पवन शंकर अलकुंटे (वय-20 रा. शंकरमठ, हडपसर) याला अटक केली आहे. तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट पाच चे पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना माहिती मिळाली की, पवन अलकुंटे याने त्याच्या मित्राच्या मदतीने चारचाकी गाड्या चोरल्या आहेत. त्यापैकी एका गाडीची नंबरप्लेट काढुन तिचा वापर करत असून ते दोघे यवतवरुन पुण्याच्या दिशेने येणार आहेत.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सोलापूर-पुणे रोडवर नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान गुन्ह्यात चोरीला गेलेली गाडी यवतच्या दिशेने येताना पोलिसांना दिसली. पथकाने गाडी अडवून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून चोरलेल्या 10 लाख 50 हजार रुपये किमतीच्या दोन कार जप्त केल्या आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर (ACP Satish Govekar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे (Vishvajeet Kaingade PI),
पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे (PSI Avinash Lohote), पोलीस अंमलदार प्रताप गायकवाड, शहाजी काळे,
दया शेगर, विनोद शिवले, अमित कांबळे, अकबर शेख राहुल ढमढेरे, पांडुरंग कांबळे, संजयकुमार दळवी यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Cheating Fraud Case | पिंपरी : वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने फसवणूक, 20 लाखांचा गंडा

Mahavikas Aghadi Protest | सर्व सामान्य जनतेला वीज दरवाढीचा ‘शॉक’ ! महाविकास आघाडीचे पुण्यात आंदोलन (Video)

Navneet Rana | नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध

Pune Koregaon Park Crime | कोरेगाव पार्क येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, गुन्हे शाखेकडून 6 मुलींची सुटका