Pune Crime | पुण्यातील डोंगरावर फिरायला गेलेल्या दीरानं 25 वर्षीय वहिनीकडं केली ‘ती’ मागणी, विरोध करताच केलं काम तमाम

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | एका तरुणाने देहूरोड (Dehuroad) येथील घोराडेश्वर डोंगरावर आपल्या वहिनीसोबत फिरायला गेल्यानंतर, तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना (Pune Crime) उघडकीस आली आहे. आरोपी तरुणाने पीडित महिलेचा गळा आवळून हत्या (Murder) केल्यानंतर तिचं डोकं दगडानं ठेचलं आहे. काही स्थानिकांना डोंगरावरील एका झुडुपात महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी माहिती समजताच पोलिसांनी गुन्हा दाखल (FIR) केला असून संशयित आरोपी चुलत दीरास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

याबाबत माहिती अशी, हत्या झालेल्या 25 वर्षीय महिला देहूरोड येथील थॉमस कॉलनीत (Thomas Colony, Mamurdi, Dehu Road,) वास्तव्याला होत्या.
तर तुकाराम कोंडीबा धडस Tukaram Kondiba Dhadas (वय,24) असं अटक केलेल्या आरोपी चुलत दीराचं नाव आहे.
मृत महिला रविवारी पहाटे आपल्या चुलत दीरासोबत घोराडेश्वर डोंगरावर फिरायला गेल्या होत्या.
दरम्यान नराधम चुलत दीराने मृत महिलेकडे शरीरसुखाची (Demand physical relation) मागणी केली. मात्र, पीडित महिलेनं शारीरिक संबंधासाठी नकार दिला.
वहिनीने लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने चिडलेल्या आरोपी चुलत दीराने पीडितेची थेट गळा आवळून हत्या (Murder) केली आहे.

 

दरम्यान, त्यानंतर त्याने पीडितेची ओळख पटू नये, म्हणून तिचं दगडाने डोकं ठेचलं आहे.
यानंतर आरोपीनं पीडितेचा मृतदेह एका झुडुपात टाकून दिला. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला आहे. सोमवारी सकाळी काही स्थानिकांच्या मृतदेह निदर्शनास आल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
घटनेचा छडा लावून काही तासांत आरोपी दीराला अटक केली आहे.
याप्रकरणी अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलीस (Talegaon Dabhade Police) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | brother in law demand physical relation to sister in law after she refuse he done murder on ghoradeshwar of pimpri

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात पुण्यात 37 वर्षीय महिलेनं हाताची शीर कापून घेतला गळफास, प्रचंड खळबळ

BJP vs NCP | चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांच्या शंभर कार्यकर्त्यांकडून जो झटका मिळेल, तो पचविण्याची तयारी ठेवावी – राष्ट्रवादी

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात 237 कोरोना मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी