Pune Crime | टोळक्याकडून बांधकाम व्यावसायिकास बेदम मारहाण, कारवर केली दगडफेक; चंदननगर-खराडी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कोणाच्याही भांडणात पडले तर त्या दोघांची भांडणे राहतात बाजूला. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणार्‍यालाच मार पडतो, असे अनेकदा घडले आहे. मात्र, दोघाच्या भांडणात तोंडओळखीच्या तरुणाची पडलेली मोटारसायकल उचलून देणे एका बांधकाम व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले. माझ्या मोटारसायकलला हात का लावला, म्हणून त्याने भांडणे सोडून साथीदारांना बोलावून मदत करणार्‍या बांधकाम व्यावसायिकाला (Builders In Pune) बेदम मारहाण केली. त्यांच्या कारवर दगडफेक केली. (Pune Crime)

 

याप्रकरणी अजय राजेंद्र जाधव (वय ३३, रा. जयप्रकाशनगर, मुंढवा) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १९१/२२) दिली आहे. त्यावरुन ऋषिकेश पठारे (रा. खराडी), भुवेश आदक आणि त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार खराडी येथील जत्रा हॉटेल (Hotel Jatra, Kharadi) बाहेर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय जाधव हे बांधकाम व्यावसायिक आहेत.
ते आपले मित्र मयुर साकोरे, अजय भांडवलकर यांच्यासह बापू शिंदे यांच्या कारमधून हॉटेल जत्रा येथे जेवायला गेले होते.
जेवण झाल्यावर अजय जाधव हे बाहेर आले. त्यांचे मित्र आत जेवण करीत होते.
त्यावेळी हॉटेलसमोर त्यांच्या तोंड ओळखीचा भुवेश आदक व एकामध्ये काही कारणावरुन वादावादी चालू होती.
या भांडणामध्ये भुवेश याची यामाहा मोटारसायकल खाली पडली. जाधव यांनी ही मोटारसायकल उचलली.
तेव्हा त्यांचे भांडण बाजूला राहिले.
भुवेश याने जाधव यांना बाजूला ढकलले. “तू माझी गाडी का उचलली़ माझ्या गाडीला तू हातच का लावला तुझा काय संबंध आहे,” म्हणून त्याने धक्काबुक्की केली. “तुझ्याकडे पाहतो,” असे म्हणून कोणाला तरी फोन लावला.
थोड्या वेळात तेथे एका इनोव्हा गाडीतून दोघे जण आले. त्यातील ऋषिकेश पठारे याने एका दगड फिर्यादीच्या डोक्यात मारुन जखमी केले. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराने पाठीत दगड फेकून मारला. त्यांनी तेथे असलेल्या बापू शिंदे यांच्या क्रेटा गाडीवर दगड फेकून तिचेही नुकसान केले. भुवेश याने तेथील हॉटेलवाल्याकडून लोखंडी झरा घेऊन त्याने फिर्यादी यांच्या हातावर व इतरत्र मारहाण केली. तेव्हा त्यांचे मित्र बाहेर आल्यावर त्यांनी फिर्यादी यांची सुटका करुन गाडीतून जाऊ लागले. तेव्हा त्यांनी गाडी अडवून परत फिर्यादी यांना गाडीतून बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन धमकी देऊन निघून गेले. हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांनी फिर्यादी दिली असून चंदननगर पोलीस तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Builder beaten to death by mob pelted with stones at car Incidents in Chandannagar Kharadi area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा