Pune Crime | ‘त्या’ प्रकरणात भाजप नगरसेवक धनराज घोगरेंसह 4 जणांवर गुन्हा दाखल; प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) काम मिळवून देण्याच्या बहाण्याने ठेकेदाराकडून तीन लाख रुपये घेऊन एका भाजप नगरसेवकाने (BJP corporator) फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) समोर आला आहे. एवढेच नाही तर पैसे घेऊन देखील काम न दिल्याने पैशांची मागणी ठेकेदाराने केली असता त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. या  प्रकरणी पुण्यातील (Pune Crime)  भाजपचे प्रभाग 25 चे नगरसेवक धनराज घोगरे (Dhanraj Ghogre) यांच्यासह चार जणांवर फसवणूक आणि मारहाणीचा (beating) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2020 ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत घडला आहे. सत्ताधारी भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल झाल्याने पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

याप्रकरणी धनराज घोगरे, सुरेश तेलंग Suresh Telang (दोघे, रा. हेवन पार्क, वानवडी), विनोद माने पाटील (Vinod Mane Patil), गुड्डू Guddu ( दोघे. रा. वानवडी)अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत निखील रत्नाकर दिवसे (Nikhil Ratnakar Divse) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (Pune Crime) दिवसे आणि त्यांचे मित्र विक्रांत कांबळे हे भागीदारीमध्ये ठेकेदारीचा (Contractor) व्यवसाय करतात. ते शौचालय, ड्रेनेज, डांबरीकरण इत्यादी कामे करतात. मागील वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये फिर्यादी यांची निखील बहीरट या मित्राने प्रभाग 25 चे भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांच्यासोबत ठेकेदारीबाबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान नगरसेवकांनी त्यांना प्रभाग 25 मधील कामे देण्याचे आश्वासन दिले.

त्यानंतर नगरसेवक घोगरे यांच्या शिवरकर रस्त्यावरील कार्यालयात झालेल्या भेटीमध्ये ‘माझ्या प्रभागातील कामे देतो, मला तीन लाख रुपये द्यावे लागतील’, असे फिर्यादी दिवसे यांना सांगण्यात आले. त्यानंतर दिवसे यांनी नगरसेवकांच्या साथिदारांना तीन लाख रुपये दिले. परंतु पैसे देऊन देखील नगरसेवकांनी काम दिले नाही असे फिर्यादीत नमूद केले आहे.

दरम्यान काम न मिळाल्याने फिर्यादी दिवसे यांनी दिलेले तीन लाख रुपये परत मागितले.
त्यावेळी नगरसेवक आणि त्यांच्या साथिदारांनी त्यांना मारहाण करुन पाहून घेण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
फिर्यादी दिवसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वानवडी पोलिसांनी भाजप नगरसेवकासह चार जणांवर फसवणूक,
मारहाण इत्यादी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | cheating case against bjp corporator Dhanraj Ghogre in wanwadi police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Khel Ratna Award | नीरज चोपडा आणि क्रिकेटर मिताली राजसह क्रीडा जगतातील ‘या’ 11 दिग्गजांचे ’खेलरत्न’ पुरस्कारासाठी नामांकन

Maharashtra Cabinet Decision | महानगरपालिका, नगरपरिषदांमधील सदस्य संख्येबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Pune Corporation | ‘पोलीसनामा’ इम्पॅक्ट ! ‘सर्वपक्षीयांनी’ स्मार्ट सिटीचे 58 कोटी रुपयांचे दायित्व महापालिकेवर लादले; राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, कॉंग्रेसला पुन्हा एकदा ‘पश्‍चाताप’