Pune Crime | कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेचा छापा, मेफेड्रॉनची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime |  मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एक तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने सापळा रचून अटक केली. ही कारवाई (Pune Crime) गुरुवारी (दि.24) कोंढवा येथील भैरवनाथ मंदिर चौकात केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

रिहान इलियास खान (वय-19 रा. सैफिलेन मुस्लीम बँके जवळ, कॅम्प, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोंढवा परिसरात पेट्रोलींग करत असताना भैरवनाथ मंदिर चौकात एकजण मेफेड्रॉनची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी सार्वजनिक रोडवर सापळा रचून आरोपी रिहान खान याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 1 लाख 80 हजार रुपये किमतीचे 9 ग्रॅम मेफेड्रॉन आढळून आले. पोलिसांनी अंमली पदार्थ आणि मोबाईल असा एकूण 1 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वगरे करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक,
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे,
पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, पोलीस अंमलदार साहिल शेख, आझीम शेख, संदिप जाधव,
चेतन गायकवाड, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Crime Branch raids in Kondhwa police station limits, youth arrested for selling mephedrone

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | लोणी काळभोर व विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 20 जण ताब्यात

Maharashtra Karnataka Border Issue | कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी काढली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अंत्ययात्रा

Sanjay Raut | संजय राऊतांना मोठा दिलासा ! उच्च न्यायालयाची जामिनाविरोधात सुनवाई करण्यास नकार