Pune Crime | पुण्यात डॉक्टर महिलेच्या कारच्या धडकेत कुत्र्याचा मृत्यु; कोरेगाव पार्कमध्ये डॉ. मेघना चावला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime | सोसायटीत फिरणार्‍या कुत्र्याच्या (Dog) तोंडावरुन कार घातल्याने त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यु झाल्याची घटना कोरेगाव पार्कमधील (Koregaon Park) एका सोसायटीत घडली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी डॉक्टर महिलेविरुद्ध प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियमानुसार गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. डॉ. मेघना चावला Dr. Meghna Chawla (रा. डुंगरसी पार्क सोसायटी, बंडगार्डन रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने कोरेगाव पार्क पोलिसांकडे (Koregaon Park Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना सोसायटीच्या आवारात मंगळवारी सकाळी 11 वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि डॉ. मेघना चावला (Dr. Meghna Chawla) या एकाच सोसायटीत राहतात. डॉ. चावला यांनी त्यांच्या ताब्यातील कार हयगयीने व निष्काळजीपणे चालवून पुणेकर यांच्या विटकरी रंगाच्या कुत्र्याला धडक दिली. कुत्र्याच्या तोंडावरुन त्यांच्या कारच्या डाव्या बाजूचे पुढील चाक गेल्याने कुत्रा जखमी झाला होता. फिर्यादी यांनी त्यांना उपचाराकरीता प्राण्यांचे डॉक्टरांकडे घेऊन गेल्या. उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. कोरेगाव पोलीस तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Anti Corruption Nashik | 8 लाखांच्या लाच प्रकरणी महिला शिक्षणाधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; महासंचालकांच्या आदेशाने ठाणे ACB कडून नाशिकमध्ये कारवाई, प्रचंड खळबळ

Taliban Terrorism | अफगाणिस्तानमध्ये राहणार्‍या भारतीयांसाठी सुरक्षा अ‍ॅडव्हायजरी जारी, ’तात्काळ’ मायदेशी परतण्याचा सल्ला

Blood Donation Camp | आचार्य आनंदऋषी यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | crime registered against dr meghna chawla in koregaon park police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update