Pune Crime | शंकरशेठ रोडवरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील सराईत गुन्हेगार जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शंकरशेठ रोडवरील (Shankar Sheth Road, Pune) पेट्रोल पंपावर दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट ३ (Pune Police Crime Branch) च्या पथकाने छापा टाकून जेरबंद (Pune Crime) केले.

 

गणेश मल्लेश रायचूर(Ganesh Mallesh Raichur) (वय २७, रा. एस आर ए बिल्डिंग, कात्रज), सादिक फिरोज खान (Sadiq Feroz Khan) (वय २२, रा. लोहियानगर), सुरज नंदु सकट (Suraj Nandu Sakat) (वय २२) आणि सागर राजू अवघडे (Sagar Raju Avaghade) (वय ३०, रा. लोहियानगर) अशी अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार मन्या पळून गेला. आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार संतोष सूर्यकांत क्षीरसागर (Police Santosh Kshirsagar) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे.

 

गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे (Pune Police) पथक मंगळवारी रात्री ९ वाजता गस्त घालत असताना शंकरशेठ रोडवरील पेट्रोल (Petrol Pump On Shankar Sheth Road) पंपाजवळील चुन्नीकृपा बिल्डिंगच्या बाजूला अधांरात काही जण थांबले असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी त्यांना घेरुन पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सत्तूर, नायलॉन दोरी, मिरची पावडर, चाव्या, मोपेड, मोबाईल मिळून आले.
त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी एकत्र आल्याची कबुली दिली.

#Pune Crime     #Pune Police Crime Branch     #Pune Police      #Khadak Police Station      #Pune Police

 

Web Title :- Pune Crime | Criminals arrested in preparation for robbery at petrol pump on Shankar sheth Road pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा