Pune Crime | मॉर्फिंग करुन अश्लिल फोटो नातेवाईकांना पाठवून तरुणाची बदनामी; हँडी लोन अ‍ॅप डाऊनलोड करणे पडले महागात !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | झटपट ऑनलाईन कर्ज देण्याचे आमिष दाखवून (Lure Of Online Loan) अ‍ॅप डाऊनलोड (Online Loan App Download) करायला सांगतात. पैसे फेडल्यानंतरही त्यांच्याकडून सातत्याने पैशांची मागणी (Demand Of Money) केली जाते. त्यांनी नकार दिला तर त्यांच्या मोबाईलमधील फोटो मॉर्फिंग करुन ते नग्न स्त्रीपुरुषांबरोबर जोडून सर्वांना पाठवून बदनामी केली जाते. सध्या या सायबर चोरट्यांनी (Pune Cyber Crime) मोठ्या प्रमाणावर धुमाकुळ घातला आहे. हँडी लोन अ‍ॅप डाऊनलोड (Handy Loan App Download) करणे एका तरुणाला खूपच महागात पडले आहे. त्याने कोणतेही कर्ज घेतले नव्हते. केवळ गुगल प्ले स्टोअरवरुन (Google Play Store) हँडी लोन अ‍ॅप डाऊनलोड केले होते. तरीही त्याला कर्ज फेडण्यासाठी धमकाविले जात होते. त्याचे मैत्रिणीबरोबरील फोटो मॉर्फ करुन त्याच्या नातेवाईकांना पाठवून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी भेकराईनगर (Bhekrai Nagar) येथे राहणार्‍या एका ३५ वर्षाच्या तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६७९/२२) दिली आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी सांगितले की, या तरुणाने ३१ मे रोजी हँडी लोन अ‍ॅप डाऊनलोड केले होते.
मात्र, कोणतेही कर्ज घेतले नव्हते. तरीही त्यांना २ जून रोजी तुम्ही कर्ज घेतले आहे.
ते भरा नाहीतर तुमच्या विरुद्ध कारवाई करुन तसेच व्हाटसअ‍ॅप ग्रुपवरुन (WhatsApp Group) नातेवाईक व मित्रांना पॉर्न चित्रे पाठवून बदनामी करु.
आधार कार्ड (Aadhaar Card), पॅन कार्ड (PAN Card) ब्लॉक करु असे धमकावित होते.
त्यानंतर त्यांना वारंवार धमकी देणारे फोन येत होते.
त्यांनी आपण कोणतेही कर्ज घेतले नसल्याचे सांगून कर्ज भरण्यास नकार दिला.
त्यानंतर ९ जून रोजी त्यांच्या दोन्ही व्हॉटसअ‍ॅप नंबरवर (WhatsApp Number) त्याचा चेहरा मॉर्फ करुन अश्लील नग्न पुरुषाचे फोटोला (Nude Photo) जोडलेला फोटो त्यांना प्राप्त झाला.
तसेच असाच फोटो त्यांची पत्नी, नातेवाईक व मित्र मैत्रिणीचे व्हॉटसअ‍ॅपवर प्रसारित झाला आहे.
त्यांच्या पत्नीच्या मैत्रिणीला फिर्यादी यांचा नग्न फोटो या मैत्रिणीबरोबर मॉर्फ करुन जोडलेला आढळून आला.
या प्रकाराने त्यांची सर्व नातेवाईक, मित्र मैत्रिणींमध्ये बदनामी झाल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे.

 

 

 

Web Title :- Pune Crime | Defaming young people by morphing and sending obscene photos to relatives Handy Loan App Downloading Expensive

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा