Pune Crime | सोसायटीतील वाद ! 60 वर्षाच्या गृहस्थाने शेजार्‍यावर चक्क केला खुनी हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सोसायटीतील पाणी पुरवठा व इतर कारणावरुन झालेल्या वादातील राग मनात धरुन एका ६० वर्षाच्या गृहस्थाने लोखंडी सळई डोक्यात मारुन एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) प्रमोद गुलाबराव राक्षे (वय ६०, रा. विघ्नहर्ता कॉम्प्लेक्स, मांगडेवाडी, कात्रज) यांना अटक केली आहे.

 

याप्रकरणी सूर्यकांत भानुदास सितापुरे (वय ४०) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सितापुरे आणि प्रमोद राक्षे हे दोघेही विघ्नहर्ता कॉम्प्लेक्समध्ये राहतात. साधारण २ ते ३ महिन्यांपूर्वी सोसायटीतील पाणी पुरवठा व इतर कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता (Pune Crime). रविवारी रात्री पावणे अकरा वाजता सूर्यकांत सितापूरे हे इमारतीच्या पार्किंगमध्ये असताना जुन्या वादाच्या रागातून राक्षे यांनी मागून येऊन त्यांच्या डोक्यात लोखंडी सळईने मारहाण केली. ते मागे फिरले असता तुला खल्लास करणार, सोडणार नाही, असे म्हणून पुन्हा दोनदा त्यांच्या डोक्यात सळईने वार करुन गंभीर जखमी केले. त्यांची पत्नी सोडवण्यास आली असताना त्यांनाही शिवीगाळ केली. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन प्रमोद राक्षे यांना अटक केली आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Disputes in society A 60 year old man attacked his neighbor

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा