Pune Crime | खळबळजनक ! पुण्याच्या चंदननगर परिसरात युवकाचा गोळ्या झाडून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | चंदनगर परिसरातील (Chandan Nagar) दुर्गामाता मंदिर एकनाथ पठारे वस्तीजवळ युवकाचा गोळ्या झाडून (Firing In Pune) खून झाल्याची (Murder In Pune Chandan Nagar) घटना आज (रविवार) सकाळी घडली आहे (Pune Crime). अक्षय प्रकाश भिसे (Akshay Prakash Bhise) खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेचे पोलिस (Pune Police Crime Branch) आरोपींचा शोध घेत आहेत.

 

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अक्षयचा खून हा पुर्ववैमनस्यातून झाला आहे. अक्षय हा सकाळी दुर्गामाता मंदिराजवळ उभा होता. त्यावेळी दोघांनी पिस्तुलाने त्याच्यावर बेछुट गोळीबार केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला झाला. गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह इतरांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

जखमी अवस्थेतील अक्षयला उपचारासाठी रूग्णालयात हवविण्यात आले.
मात्र, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
अक्षयवर गोळ्या झाडणार्‍यांचा शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
अक्षय भिसे हा कचर्‍याच्या गाडीवर काम करत होता अशी माहिती सांगण्यात येत आहे.
दरम्यान, दहीहंडीच्या दिवशीच सिंहगड रोडवर देखील उत्सव काळातच गोळीबार झाला होता.
त्यानंतर सकाळी गोळ्या झाडून युवकाचा खून केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Exciting! Youth shot dead in Pune’s Chandannagar area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | आंबेगाव पठार येथे राडा; गुंडांकडून मध्यरात्री मोटारीच्या काचा फोडून दहशत

 

अकाउंट अ‍ॅग्रीगेटर सिस्टमशी जोडले SEBI, शेयर बाजारसंबंधी आर्थिक माहिती शेअर करणे होईल सोपे

 

NPS Tier 1 Vs Tier 2 | मिळवायची असेल जादा Tax सवलत, एनपीएस खाते उघडताना निवडा ‘हा’ पर्याय