Pune Crime | पुण्यात रिक्षाचालकांना बनावट कॅलिब्रेशन प्रमाणपत्र; शासनाची फसवणूक करणाऱ्यांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे आरटीओने तीनआसनी ऑटो रिक्षांना भाडेवाढ लागू केली आहे. मात्र, त्यासाठी मीटर कॅलिब्रेशन करून घेणे रिक्षाचालकांना अनिवार्य करण्यात आले आहे. याचा फायदा घेऊन पुण्यातील रिक्षाचालकांना बनावट शिक्के मारून कॅलिब्रेशन प्रमाणपत्र दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस (Pune Crime) आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सहायक मोटार वाहक निरीक्षक तनुजा संपत डोके (वय 27) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.5) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पराग मोतीवाले (वय 51), नजीर सय्यद (वय 43) यांच्यासह इतर संबंधितांवर आयपीसी 420, 465, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल करून मोतीवाले व सय्यद यांना अटक केली आहे. हा प्रकार 1 सप्टेंबर 2022 ते 5 डिसेंबर 2022 या कालावधीत आळंदी रोड, फुलेनगर येथे घडला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांच्या नावाची बनावट सही करून बनावट शिक्के मारून रिक्षाचालकांना बनावट प्रमाणपत्रं दिली.
या प्रमाणपत्रांवर बनावट अनुक्रमांक टाकण्यात आला आहे.
हे बनावट मीटर कॅलिब्रेशन प्रमाणपत्र देण्यासाठी आरोपींनी रिक्षाचालकांकडून प्रत्येकी 300 रुपये घेऊन शासनाची फसवणूक केली.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी आजपर्यंत किती जणांना बनावट प्रमाणपत्र दिली आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काटे करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Fake calibration certificates for rickshaw pullers in Pune; Those who cheated the government were arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SSC HSC Exam | सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आता 50 रुपये; शिक्षण मंडळाचा निर्णय

Ramdas Athawale | ‘भीमशक्ती प्रकाश आंबेडकरांसोबत नसून माझ्यासोबत’ – रामदास आठवले

Supriya Sule | ‘शरद पवारांनी लाठ्या खाल्ल्या; पण माघार नाही घेतली’ – सुप्रिया सुळे