Pune Crime | धक्कादायक ! स्वत:च्या 11 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, सख्ख्या आईनेच दिली मुलाविरुद्ध तक्रार

पुणे / हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरामध्ये मागील काही दिवसांपासून महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना वाढत आहेत. पुण्यातील (Pune Crime) हिंजवडी परिसरात (Hinjewadi Area) एका नराधम बापाने आपल्या 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police) 35 वर्षीय नराधम बापाला अटक (Arrest) केली आहे. गंभीर बाब म्हणजे आरोपीने मुलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय आरोपी वडील, पीडित 11 वर्षीय मुलगी आणि मुलगा असे तिघे हिंजवडी परिसरात राहतात. तर आरोपीची पत्नी तीन वर्षांपासून वेगळी राहते. मुलं आरोपीकडे राहतात. आरोपीने 13 मार्चला सकाळी मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 मार्चला पुन्हा तिच्या एकटेपणाचा फायदा घेत अत्याचार केले. (Pune Crime)

या घटनेमुळे मुलगी खूप घाबरली होती. मात्र, आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगायचा कोणाला हे तिला कळत नव्हतं.
दरम्यान, धुळवड (Dhulwad) आणि होळी (Holi) आल्याने पीडित मुलगी आणि मुलगा यांना आरोपीने आजीकडे गावी सोडले.
होळी आणि धुळवड झाली तरी मुलगी घरी जाण्यास तयार नव्हती.
आजीने नातीला विश्वासात घेऊन काही झालं का ? अशी विचारणा केली. त्यावेळी पीडित मुलीने वडील घाणेरडे वागत असल्याचे आजीला सांगितले.
आजीने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) धाव घेत आपल्या सख्ख्या मुलाविरोधात तक्रार (FIR) दिली.
पोलिसांनी आरोपी विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन 35 वर्षीय नराधम बापाला अटक केली आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | father sexually exploited his own minor daughter grandmother filed complaint against son in Hinjewadi police station pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा