Pune Crime | छळाला कंटाळून विवाहितेची टेरेसवरुन उडी घेऊन आत्महत्या; कात्रज परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सासरी होणार्‍या छळाला कंटाळून विवाहितेने इमारतीच्या टेरेसवरुन उडी घेऊन आत्महत्या (Married Woman Suicide Case) केली. हा प्रकार कात्रज येथील सावंत कॉर्नरमधील बी विंगमध्ये सोमवारी पहाटे घडला. (Pune Crime)

 

पल्लवी वसंत नाईक (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील राजेंद्र रामचंद्र ढोणे (वय ५५, रा. चिंचवड) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पती वसंत अरुण नाईक (वय ४१) आणि सासू नर्मदा नाईक (वय ६५, रा. सावंत कॉर्नर, कात्रज) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी व वसंत नाईक यांचा जानेवारी २०१० मध्ये विवाह झाला होता.
लग्नानंतर घरगुती कारणावरुन तसेच तिच्यावर संशय घेऊन पती वसंत व सासू तिचा मानसिक व शारीरीक छळ करीत होते.
या छळाला कंटाळून शेवटी तिने सोमवारी पहाटे इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केली.
पोलीस उपनिरीक्षक ढमे अधिक तपास करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Fed up with harassment a married woman jumps off a terrace and commits suicide Incidents in Katraj area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा