Pune Crime | अश्लिल बोलून 12 वर्षाच्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारुन विनयभंग, सराईत गुन्हेगारावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | अश्लिल बोलून एका अल्पवयीन मुलीचा (minor girl) विनयभंग करुन तिच्या प्रायव्हेट भागावर (Private Part) लाथ मारुन जखमी केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील (Pune Crime) घोरपडी गावात घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa police station) फिर्याद दिली असून पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.3) दुपारी तीनच्या सुमारास घडला आहे.

 

आदिल सुलतान शेख Adil Sultan Shaikh (वय-28 रा. घोरपडी गाव, पुणे) असे गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी पीडीत मुलीच्या आईने (वय-32) मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी आरोपी विरुद्ध पॉक्सो अंतर्गत (Pocso Act) गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात.
बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास आरोपीने फिर्यादी यांच्या 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अश्लिल शिवीगाळ  केली.
तसेच ‘तेरे ते कपडे उतारके नंगा करुंगा’ असे म्हणत तिचा विनयभंग केला.
एवढेच नाहीतर पीडित मुलीच्या प्रायव्हेट भागावर लाथ मारून तिला गंभीर जखमी केले असे तक्रारीत म्हटले आहे.
पुढील तपास मुंढवा पोलीस (Mundhwa Police Station) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | FIR against criminal for kicking 12-year-old girl private part

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयाकडून सैनिकांना दिवाळी फराळ तर स्वच्छतादूतांनाही मिठाई वाटप

Katraj Kondhwa Road Pune | कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामाला तूर्तास ‘ब्रेक’ ! सध्या अस्तित्वातील रस्त्याचे डांबरीकरण होणार

Indian Independence Movement | दिवाळीनिमित्त ब्रिटनमध्ये महात्मा गांधींच्या स्मरणार्थ जारी करण्यात आले सोने-चांदीचे नाणे