Pune Crime | पुण्याच्या एनआयबीएम रोडवरील आयटी कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंटवर विनयभंग आणि अ‍ॅट्रोसिटीचा FIR

पुणे : पोलीसानामा ऑनलाइन – Pune Crime | आयटी कंपनीत (IT Company On NIBM Road) काम करणाऱ्या महिलेला गाडीतून सोडवण्याच्या बहाण्याने अश्लील बोलून तिचा विनयभंग (Molestation Case) केला. तसेच पीडित महिलेला जातिवाचक बोलून अपमानित केल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime) कोंढवा बु. (Kondhwa Budhruk) येथील एनआयबीएम रोड वरील (NIBM Road) एका आयटी कंपनीमध्ये घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंटवर (Vice President) विनयभंग आणि अ‍ॅट्रोसिटीचा (Atrocity Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

याबाबत धायरी (Dhayari) येथे राहणाऱ्या 45 वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंट फिलिप जोसेफ Philip Joseph (वय-64 रा. कोंढवा बु.) वर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एप्रिल 2018 ते एप्रिल 2019 या कालावधीत कंपनीत घडला आहे. पीडित महिलेने पोलीस उपायुक्तांकडे (DCP Pune) याबाबत अर्ज केला होता. अर्जाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी व्हाईस प्रेसिडेंटवर विनयभंग आणि अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला या कंपनीमध्ये अकाउंटंट (Accountant) कम रिसेप्शनिस्ट (Receptionist) म्हणून काम करत होत्या.
कंपनीत काम करत असताना आरोपीने वारंवार कामामध्ये चुका कढून सर्वांसमोर अर्वाच्च आणि जातिवाचक बोलून अपमानित केले.
तसेच काम नसताना केबिनमध्ये बोलून घेऊन थांबवून ठेवले.
आरोपीने ऑफिसची वेळ संपल्यानंतर देखील पीडित महिलेला ऑफिसमध्ये थांबवून त्यानंतर त्याच्या गाडीतून घरी सोडायला जात असताना अश्लील बोलून महिलेसोबत गैरवर्तन केले. याबाबत महिलेने पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता.
या अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी मंगळवारी (दि. 29) आरोपी फिलीप जोसेफ याच्यावर गुन्हा दाखल केला.
पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | FIR against vice president of IT company on NIBM Road, Pune for molestation and atrocity

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Girish Bapat | ‘बिबवेवाडीतील ESIC रुग्णालयात सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलसोबतच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे’ – खासदार गिरीश बापट यांची लोकसभेत मागणी

 

Rashmika Mandanna | ‘श्रीवल्ली’च्या प्रेमात पडला चक्क चिंपांझी, व्हायरल व्हिडिओ पाहून प्रेक्षकांना बसला धक्का..

 

PMC Employees-7th pay commission | मार्च महिन्याच्या वेतनात पुणे महापालिका कर्मचारी, अधिकार्‍यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळणार