Pune Crime | दक्षिण कोरियाच्या प्रसिद्ध बांधकाम कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरसह दोघांवर पुण्यात FIR; जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दक्षिण कोरियाच्या प्रसिद्ध बांधकाम कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरसह दोघांवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीने अहमदनगर येथील व्यक्तीची तब्बल 3 कोटी 62 लाख 94 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

याप्रकरणी यु.सेउंग.सॅग.सा. इंडिया कन्स्ट्रक्शन कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर हर सेंग हवी (वय 53) आणि एक्सि डायरेक्टर सीओक हो चँग (वय 51) अशी गुन्हा (Fir) दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सुशमेश ओमप्रकाश शर्मा (वय 51, सोलेश पार्क, बी.टी. कवडे रोड, पुणे) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोऱ्याच्या या कंपनीने बी. टी. कवडे रस्त्यावर एका नवीन इमारतीचे काम सुरू केले होते. M/s Housing India Pvt. ltd. (HIPL) या कंपनीसाठी इमारतीचे बांधकाम सुरू होते. या इमारतीच्या करण्याची व इंटिरियर काम करण्याची वर्क ऑर्डर दिली होती. हे काम फिर्यादी कडून पूर्ण करून घेतले आणि या कामाच्या बदल्यात होणारी 3 कोटी 62 लाख, 94 हजार 441 इतकी रक्कम न देता फसवणूक केली आहे. त्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता कंपनीची कार्यालय बंद केले. अधिक तपास मुंढवा पोलीस (Mundhwa Police) करत आहेत.

Web Title :- Pune Crime | FIR in Pune against the two, including the managing director of a well known construction company in South Korea; Learn the case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IRCTC News : आता ऑनलाइन रेल्वे तिकिट बुकिंगपूर्वी करावे लागेल मोबाइल आणि ईमेल व्हेरिफिकेशन; जाणून घ्या

Pune Crime | कोंढवा पोलिसांकडून पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या भाजपच्या माजी नगरसेवक विवेक यादवला गुजरात बॉर्डरवरून अटक

Earthquake | बिकानेरमध्ये 24 तासात दुसर्‍यांदा भुकंपाचे झटके; पाकिस्तान होता केंद्रबिंदू, जीवितहानीचे अद्याप वृत्त नाही

Pimpri Crime | नवर्‍याबरोबर ठेवतेस तसे माझ्याबरोबरही संबंध ठेव; सासर्‍याने केली सुनेकडे शरीरसुखाची मागणी