Pune Crime | पैसे परत देण्यास नकार दिल्याने तरुणाला मारहाण, हाताची नखे उपटून काढण्याची दिली धमकी; हडपसर पोलिस ठाण्यात 4 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शेअर मार्केटमध्ये गुंतविलेले (Stock Market Investment) पैसे परत देण्याची मागणी करुन ते न दिल्याने चौघांनी तरुणाला कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण (beating) करुन हाताची नखे उपटून (Plucking Nails) काढण्याची धमकी (Threat) देण्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

 

याप्रकरणी अभिषेक विजय पवार Abhishek Vijay Pawar (वय 22, रा. अंजना अपार्टमेंट, भेकराईनगर, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सागर हेगडे Sagar Hegde (रा. फुरसुंगी), मयुर पडवळ Mayur Padwal (रा. चाकण), पंकज पांचाळ Pankaj Panchal (रा. भेकराईनगर) आणि अमित अवचरे Amit Awachare (रा. तुकाईदर्शन) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार (Pune Crime) भेकराईनगर येथील आयबीएम कंपनीजवळ, तसेच तुकाईदर्शन येथे मंगळवारी रात्री दहा वाजता आणि बुधवारी मध्यरात्री एक वाजता घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक पवार याच्याकडे काही लोकांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यासाठी पैसे दिले होते़.
पण तो ते परत करत नव्हता. 19 जुलै रोजी रात्री दहा वाजता तो व त्याचा मित्र वैष्णव पाडुळे हे चालत घरी जात असताना भेकराईनगर (Bhekrainagar) येथे चौघांनी त्यांना अडविले.
त्याचे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केलेले पैसे आताच्या आता परत दे, अशी मागणी करुन फिर्यादी याला हाताने मारहाण केली.

त्यानंतर 20 जुलै रोजी मध्यरात्री फिर्यादी हे घरी असताना आरोपींनी त्याला घराबाहेर बोलविले.
आमचे पैसे आता परत दे असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
शॉपमधील फायबर वायर व पँटच्या कमेरचा पट्टा याने फिर्यादीच्या पाठीवर व हातावर मारहाण करुन जखमी केले.
सागर हेगडे याने तु जवळचा आहे, म्हणून तुला सोडतो. तु आमचे पेसे लवकर परत दे,
नाही तर तुझे हाताची नखे उपटून काढली असती, अशी धमकी दिली. पोलीस नाईक भोसले (Police Naik Bhosale) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | For refusing to return the money, the young man was beaten, threatened with pulling out his fingernails; FIR against 4 people in Hadapsar police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weight Loss Ayurveda Tips | लठ्ठपणा कंट्रोल करण्यासाठी आयुर्वेदाचा आधार, जाणून घ्या कोणत्या गोष्टी खाल्याने कमी होते वजन

 

Pune Crime | सराफी दुकानातून 2 कोटी 60 लाखांचे 5 किलो सोन्याची बिस्किटे चोरुन नेणारी महिला गजाआड

 

CBSE 12th Result | सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल