Pune Crime | फसवणूक प्रकरण ! एम.जी. एन्टरप्रायजेसच्या अलनेश सोमजी व पत्नी डिंपल सोमजीला ‘एवढ्या’ दिवसांची पोलीस कोठडी (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गुंतवणूक (Investment) केलेल्या रक्कमेवर वार्षिक 24 टक्के परतावा (24 percent return) देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील (Pune Crime) अनेक नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एम.जी. एन्टरप्रायजेसच्या (M.G. enterprises) अलनेश अकील सोमजी (Alnesh Akil Somji), डिंपल अलनेश सोमजी Dimple Alnesh Somji (दोघे रा. अमर वेस्टव्हिड, लेन नं. 5, कोरेगाव पार्क, पुणे) यांना पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथकाने (Anti extortion Cell) दिल्ली विमानतळावरुन (Delhi Airport) ताब्यात घेतले (Pune Crime) होते. दिल्ली न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची ट्रान्झिट रिमांड दिली होती. ट्रान्झिट रिमांडची (Transit remand) मुदत संपत असल्याने सोमजी दाम्पत्याला आज (बुधवार) पुण्यातील शिवाजीनगर येथील MPID कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने सोमजी दाम्पत्याला 8 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

अखिलेश सोमजी आणि त्याची पत्नी डिंपल सोमजी यांनी पुण्यातील नागरिकांना 24 टक्के वार्षिक पतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमजी दाम्पत्य फरार झाले होते. आरोपी देशाबाहेर पळून जाऊ नयेत यासाठी पुणे पोलिसांनी शुक्रवारी (दि.29 ऑक्टोबर) सोमजी दाम्पत्याविरोधात लुकआऊट नोटीस (Lookout notice) जारी केली होती.

 

 

दरम्यान, श्रीलंका (Sri Lanka) मार्गे कॅनडला (Canada) पळून जाण्याच्या तयारीत असताना सोमजी दाम्पत्याला दिल्ली विमानतळावर इमिग्रेशनने (Immigration) ताब्यात घेऊन पुणे पोलिसांना (Pune Police) याची माहिती दिली. खंडणी विरोधी पथकाने दिल्ली येथे जाऊन दोघांना ताब्यात (Pune Crime) घेऊन कायदेशीर कारवाई करुन दिल्ली कोर्टात (Delhi court) हजर केल. दिल्ली कोर्टाने त्यांना दोन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर (Transit remand) पाठवले. त्यानंतर खंडणी विरोधी पथक त्या दोघांना घेऊन पुण्यात आले. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता 8 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve),
गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Shrinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare) गुन्हयाचा अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Fraud case! M.G. Enterprise’s Alnesh Somji and wife Dimple Somji remanded in police custody till 8 november

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

AADHAAR Act | आधार कार्डचा चुकीचा वापर करणे पडू शकते महागात, UIDAI आता लावू शकते 1 कोटी रुपयापर्यंतचा दंड; जाणून घ्या

Police Recruitment | पोलीस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी! डिसेंबर नंतर होणार 13000 साठी भरती, जाणून घ्या सविस्तर

Sameer Wankhede Property | समीर वानखेडेंची ‘इतकी’ आहे संपत्ती ! जाणून घ्या कुठं किती एकर जमीन अन् किती फ्लॅट