Pune Crime | पुणे महापालिकेच्या टॅक्सची बनावट पावती देऊन साडेतीन लाखांची फसवणूक; महिलेसह दोघांविरूध्द कोंढव्यात गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – Pune Crime | पुणे महापालिकेचा Pune Municipal Corporation (PMC) टॅक्स (PMC Property Tax) लावून देतो, असे सांगून एका गोदाम मालकाकडून वेळोवेळी ३ लाख ६५ हजार ८५० रुपये घेऊन त्यांना पालिकेची बनावट टॅक्स पावती (PMC Fake Tax Receipt) देऊन फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे (Pune Crime).

या प्रकरणी विजय ध्यानचंद वालिया Vijay Dhyanchand Walia (वय ५६, रा. पार्श्वनगर, कोंढवा – Kondhwa) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४४१/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रविण डांगी Pravin Dangi (वय ३५, रा. सुखसागर नगर, कात्रज – Katraj) आणि आराधना मोरे Aradhana More (वय ३५, रा. साईनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला (Pune Crime) आहे. हा प्रकार ऑगस्ट ते ऑक्टोंबर २०२१ दरम्यान पार्श्वनगर, कोंढवा, गोकुळ हॉटेल येथे घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कोंढवा बुद्रुक येथे कारपेट गोडाऊन (Carpet Godown) आहे. त्या गोडाऊनला पुणे महापालिकेचा टॅक्स लावून देतो, असे सांगून आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला. दोघांनी मिळवून टॅक्स लावण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी ३ लाख ६५ हजार ८५० रुपये घेऊन त्यांना पुणे महापालिकेची खोटी टॅक्स पावती देऊन फसवणूक (Fraud Case) केली. ही बाब फिर्यादी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी कोंढवा पोलिसांकडे (Pune Police) फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक खेतमाळ (API Khetmal) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Fraud of Rs 3.5 lakh by giving pmc fake tax receipt of Pune Municipal Corporation; Crime against two persons including a woman

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MP OBC Political Reservation | महाराष्ट्रानंतर मध्‍य प्रदेश सरकारलाही ‘सुप्रीम’ झटका ! पंचायत निवडणुकांची अधिसूचना 2 आठवड्यात काढण्याचे SC चे निर्देश

 

Sanjay Raut on Kirit Somaiya | संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर घणाघात; म्हणाले – ‘महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट’

 

Pandit Shivkumar Sharma | संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी निधन

 

Pune Crime | धक्कादायक ! घोरपडी-वानवडी परिसरात भाजी विक्रेत्याचा ग्राहकावर चाकू हल्ला