Pune Crime | खूनातील फरार आरोपीला 8 महिन्यांनी गुजरातमधून अटक, ग्रामीण पोलिसांची कारवाई

नारायणगाव/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जमिनीच्या व जुन्या भांडणाच्या कारणावरुन धारदार शस्त्राने सपासप वार करुन निर्घृण खून (Murder) करुन फरार झालेल्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) गुजरातमधून अटक (Arrest) केली आहे. खुनाच्या घटनेनंतर आरोपी 8 महिने फरार होता. रोहिदास बाबुराव पाबळे Rohidas Baburao Pable (वय-38 रा. पिंपरीकावळ) याचा 9 मार्च 2022 रोजी रात्री खून करण्यात आला होता. ही कारवाई नारायणगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch (LCB) पथकाने (Pune Crime) संयुक्तरित्या केली.

 

मन्ना उर्फ सुरज हर्जित सिंग Manna alias Suraj Harjit Singh (वय-23 रा. हरदोचक बांम्बा, मंदीर म्हाथ्रा भागी तर्न, तरन पंजाब) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यबाबत नारायणगाव पोलीस ठाण्यात (Narayangaon Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील इतर आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली असून ते येरवडा मध्यवर्ती कारागृहात (Yerwada Central Jail) आहेत. (Pune Crime)

 

स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलीस ठाण्यातील पथक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना आरोपी गुजरातमध्ये असून तो वेशांतर करुन एका कंपनीत काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या एका पथकाने गुजरात मध्ये जाऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी वेशांतर करुन आरोपीला कंपनीमधून ताब्यात घेतले. आरोपीकडे चौकशी केली असता त्याने तो मी नव्हेच असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. आरोपीला नजीकच्या पोलीस ठाण्यात नेऊन सखोल चौकशी केली असता त्याने रोहिदास पाबळे यांचा धारदार शस्त्राने आणि पिस्टच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. आरोपीला जुन्नर न्यायालयात (Junnar Court) हजर केले असता त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे (API Prithviraj Tate) करीत आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल (SP Ankit Goyal),
अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (Addl SP Mitesh Ghatte),
जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे (Sub Divisional Police Officer Mandar Jawle)
यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके (Police Inspector Ashok Shelke),
सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक धनवे (PSI Dhanwe),
नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार तापकिर, राजू मोमीन एलसीबीचे वैद्य, केंद्रे, अक्षय ढोबळे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Fugitive accused in murder arrested from Gujarat after 8 months, action taken by rural police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Salaam Venky Movie| ‘सलाम वेंकी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलिज , अभिनय आणि संवाद जिंकतील तुमचे मन

Jitendra Awhad | ‘असल्या आरोपांतून घरे उद्धवस्त होतील, त्यापेक्षा राजकारणात न राहिलेले बरे’ – जितेंद्र आव्हाड

Radhakrishna Vikhe Patil | राज ठाकरेंच्या भविष्यवाणीवर विखे पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…