Pune Crime | महिलेकडे 40 लाखाची खंडणी मागणारा इराणी गुन्हे शाखेकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मुलाविरूद्धची तक्रार मागे घेण्यास मध्यस्थी करतो, असे सांगत महिलेकडे तब्बल 40 लाखांची खंडणी (Extortion) मागणाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने (Crime Branch Unit 2) अटक केली. फर्जाद मोहम्मद रिझा फखाबादी Farjad Mohammad Reza Fakhabadi (वय-31 रा. सांळुखे विहार, एन. आय. बी. एम. कोंढवा) असे अटक (Arrest) केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

 

फिर्यादी यांच्या मुलावर 2018 मध्ये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. संबंधित गुन्ह्यातील फिर्यादी माझी मैत्रिण असून तिला मी केस मागे घेण्यास सांगतो.  मी अंजुमन इराणी ग्रुपचा (Anjuman Irani Group) साथीदार असल्याचे धमकावून त्याने महिलेला 40 लाखांची खंडणी मागितली. 6 ऑक्टोबरला दुचाकीस्वार तिघांनी महिलेला गाठून 40 लाख रूपये द्या, नाहीतर बघून घेण्याची धमकी दिली. (Pune Crime) याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, युनीट दोनने फर्जादला अटक केली.

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Police Inspector Krantikumar Patil),
सहायक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते (API Vishal Mohite), संजय जाधव, उज्वल मोकाशी, मोहसीन शेख,
गजानन सोनुने, साधना ताम्हाणे, समीर पटेल, निखील जाधव, कादीर शेख यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Gajaad from Iranian crime branch demanding ransom of 40 lakhs from the woman

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा