Pune Crime | पुण्यात टोळीयुध्द भडकले ! भरदिवसा दोन गँगमधील सराईतांची एकमेकांवर फायरिंग; अप्पा लोंढें गँगमधील संतोष जगतापसह तिघांची प्रकृती चिंताजनक (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यात पुन्हा एकदा टोळीयुध्द (firing on Gangs) भडकल्याचे चित्र समोर आले आहे. लोणीकाळभोर (Loni Kalbhor) परिसरातील उरूळी कांचन (uruli kanchan) येथील तळवेडे चौकात ही फायरिंगची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबाराच्या घटनेमध्ये 3 जण अतिशय गंभीर जखमी झाल्याचं वृत्त समजतंय. त्यामधील दोघांची प्रकृती अतिशय म्हणजे अत्यंत गंभीर (Injured) असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अप्पा लोंढे गँग आणि त्याच्या विरूध्द असलेल्या एका टोळीमध्ये हे फायरिंग झाल्याची माहिती समोर (Pune Crime) आली आहे.

 

 

Pune Crime | पुण्यात भरदिवसा बेछुट गोळीबार; वाळू व्यावसायिक संतोष जगतापसह दोघांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक (व्हिडीओ)

 

 

संतोष जगताप (Santosh Jagtap) याच्यावर देखील फायरिंग झाली असून त्यामध्ये तो गंभीर (Pune Firing) जखमी झाला आहे. पोलिसांशी याबाबत संपर्क साधला असता वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली असल्याचं सांगण्यात आलं आहे. वाळूची ठेकेदारी आणि इतर वादातून हे टोळी युध्द भडकल्याची चर्चा सध्या आहे. भरदिवसा पुण्यातील लोणीकाळभोर परिसरात ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

 

लोणी काळभोर पोलिस (Loni Kalbhor Police Station) ठाण्यातील तसेच शेजारील पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी रवाना झाले आहेत. पोलिस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) या देखील घटनास्थळी गेल्या आहेत. टोळीयुध्दातून फायरिंग झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. नेमका गोळीबार कोणत्या कारणामुळं झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, वाळुची ठेकेदारी आणि इतर काही कारणामुळे तसेच पुर्ववैमनस्यातून हा गोळीबार (Pune Firing Case) झाल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.

गोळीबारात तिघे गंभीर जखमील झाले आहेत. त्यामध्ये संतोष जगताप आणि त्याचा साथीदार तसेच विरूध्द टोळीतील एकजण गंभीर जखमी झाला आहे.
जखमी झालेल्यांना नजीकच्या हॉस्पीटलमध्ये रवाना करण्यात आलं आहे. अति वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी रवाना झाले आहेत.
पुण्यात टोळीयुध्द भडकल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

संतोष जगताप हा राहू येथील रहिवाशी आहे. त्याच्यावर गोळीबार झाला आहे.
त्याला विश्वराज रूग्णालयातून ससून रूग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची माहिती
लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली आहे. (senior police inspector rajendra mokashi)

संतोष जगताप यवत येथील 302 चा गुन्हा मधील आरोपी आहे. बॉडीगार्ड सोबत कारमधून जात असताना त्याच्यावर गोळीबार झाला आहे. पोलिसांना जागेवर तीन पुंगळ्या आहेत.

Web Title :- Pune Crime | Gang war erupts in Pune! All day long, two gangs firing on each other; The health of the three, including Santosh Jagtap of Appa Londhe Gang, is critical

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Money Laundering Case | सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेही अन् जॅकलिनला लक्झरी कार भेट दिल्याचा ED ला दाट संशय

Pune News | ‘सगळे चोर आहेत त्यांना शासन झालंच पाहिजे’, राजू शेट्टींचा सर्वपक्षीय कारखानदारांवर निशाणा

Benefits Of Exercise | अकाली वृद्धत्व आणि हृदय कमजोर होणं, एक्सरसाईज न केल्याने ‘या’ 6 प्रकारे होते शरीराचे गंभीर नुकसान; जाणून घ्या