Pune Crime | बसमध्ये सर्वांसमोर हात धरुन तरुणीचा केला विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तरुणीचा पाठलाग करुन तिचा बसमध्ये सर्वांसमोर हात धरुन आपल्याबरोबर चलण्यास सांगणार्‍या टवाळखोराला कोणीही अडविले नाही. शेवटी बसवाहकाने खाली (Pune Crime) उतरविले. तरीही त्यांची मस्ती गेली नाही. या टवाळखोराला चंदननगर पोलिसांनी (Pune Police) अटक (Arrest) केली आहे.

 

विकी भास्कर लोंढे Vicky Bhaskar Londhe (वय 27, रा. गुडवील सोसायटी, धानोरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. हा प्रकार येरवड्यातील (Yerwada) गाडीतळ बसस्टॉप तसेच चंदननगर येथील टाटा गार्ड रुमजवळील बसस्टॉपवर मंगळवारी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान घडला. याबाबत येरवडा येथे राहणार्‍या एका 20 वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी तरुणी या गाडीतळ बसस्टॉपवर बसची वाट पाहत होत्या.
त्यावेळी विकी तेथे आला. त्याने या तरुणीला गाडीवर बस मी तिकडेच चाललो आहे.
आपण दोघे लॉजवर जाऊ असे म्हणाला. फिर्यादी यांनी त्याला नकार दिला व त्या बसमध्ये बसल्या.
तेव्हा त्यांच्या मागोमाग विकी बसमध्ये चढला व त्याने फिर्यादी यांचा हात धरला. त्या ओरडल्यानंतर बसच्या वाहकाने त्याला बसमधून खाली उतरवले. बस पुढे गेली. तिच्या पाठोपाठ विकी आला. फिर्यादी या टाटा गार्ड या ठिकाणी बसस्टॉपवर उतरल्यानंतर विकी याने फिर्यादी यांचा हात ओढून गाडीवर बसण्यास सांगून त्यांना हाताने मारहाण (Beating) करुन धमकी (Threat) देऊन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक कुमरे (PSI Kumare) तपास करीत आहेत.

 

 

Web Title : –  Pune Crime | He molested the young woman by holding hands in front of everyone in the bus

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा