Pune Crime | पुण्यात ‘अवैध’ खासगी बॉडीगार्डचा ‘उन्माद’? …तर तपासणी होणार (व्हिडिओ)

पुणे : Pune Crime | स्व: सरंक्षणासाठी परवानगी दिलेल्या शस्त्राचा (gun) व्यावसायिक वापर करुन शेकडो खासगी अंगरक्षक (बॉडीगार्ड – bodyguard) दिवसाढवळ्या बेकायदेशीरपणे लोकांमध्ये ‘शेखी’ मिरवताना दिसत आहेत. प्रत्यक्षात ‘बाऊन्सर’ म्हणून त्यांना अशा शस्त्राचा (pistol) व्यावसायिक वापर करण्याची परवानगी देण्यात आलेली नसते. असे असतानाही स्वसंरक्षणासाठी दिलेल्या शस्त्र परवान्याचा ते सर्रास बेकायदा (Pune Crime) वापर करीत असल्याचे दिसून आले असून आजवर त्याकडे कोणाचेही लक्ष गेले नसल्याचा धक्कादायक प्रकार लोणी काळभोर परिसरात दोन दिवसांपुर्वी घडलेल्या टोळीयुध्दातून (Gangwar) समोर आला आहे.

 

 

वाळू व्यावसायिक संतोष संपतराव जगताप (Santosh Sampatrao Jagtap) याचा पूर्ववैमनस्यातून गोळीबार करुन खून करण्यात आला. संतोष जगताप याचा बॉडीगार्ड शैलेद्रसिंह रामबहादूर सिंग याने गोळीबाराला प्रतिउत्तर देताना केलेल्या गोळीबारात स्वागत बापू खैरे (Swagat Bapu Khaire) याचा मृत्यु झाला. याप्रकरणी शैलेंद्रसिंग याच्याविरुद्ध खूनाचा (Murder Case) गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर बाऊन्सरकडे असलेल्या शस्त्राचा प्रश्न पुढे आला आहे.

Chandrakant Patil | भाजपला हरवणे सोपे नाही, BJP चा राष्ट्रवादीला इशारा

सध्या बाऊन्सर घेऊन फिरण्याचे नवे फॅड आले आहे. ज्याच्याकडे अधिक पैसा, मग तो कोणत्या का कारणावरुन कमाविलेला असो. बेकायदेशीर व्यवसायातून कमविलेला पैसा असला तरी त्याला तेवढेच शत्रु निर्माण होतात. त्यामुळे असे लोक सध्या खासगी बाऊन्सर (बॉडीगार्ड) पदरी बाळगताना दिसून येत आहेत. त्यांच्याकडे पिस्तुलही असते. ज्यांच्याकडे लायसन्स असते, ते उघडपणे पिस्तुल बाळगताना दिसतात. अनेक जण ‘शेखी’ मिरविण्यासाठी कमरेला ते पिस्तुल लावून फिरत असतात. मात्र, या पिस्तुलासाठीचा परवाना हा स्वसंरक्षणासाठी दिलेला असतो. त्याचा आधार घेऊन दुसर्‍याच्या संरक्षणासाठी ते शस्त्र वापरण्यास हा परवाना दिलेला नसतो. मात्र, बाऊन्सर सर्रास या परवान्याचा गैरवापर करुन त्याचा व्यावसायिक वापर करताना दिसून येत आहे.

 

https://youtu.be/xbq7akKrJk4

 

 

बँक अथवा अन्य व्यावसायिक ठिकाणी दिलेला परवाना हा त्या बँकेसाठी दिलेला असतो. तो वैयक्तिक नसतो. मात्र, इथे वैयक्तिक परवान्याचा व्यावसायिक वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा सर्व बाऊन्सरकडील परवान्याची तपासणी करण्याची गरज आहे. याबाबत पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांनी सांगितले की, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीत झालेल्या गोळीबारातील (Firing Case) शैलेंद्रसिंह हा जखमी असून रुग्णालयात उपचार घेत आहे. आपल्याकडे पिस्तुलाचा परवाना असल्याचा त्याचा दावा आहे. मात्र, सध्या तो रुग्णालयात असल्याने उपचारानंतर त्याच्या परवान्याची तपासणी केली जाईल. वैयक्तिक संरक्षणासाठी दिलेल्या शस्त्र परवान्याचा व्यावसायिक वापर करण्यास परवानगी नाही. तसे होत असेल तर त्याची तपासणी केली जाणार आहे.

EPFO | तुमच्या PF अकाऊंटमध्ये व्याज आले का? ‘या’ 4 पद्धतीने तात्काळ जाणून घ्या

सध्या कोणताही कार्यक्रम म्हंटलं की सेलिब्रेटी आल्याच.
त्यांच्या संरक्षणासाठी क्रार्यक्रमाचे आयोजक पाण्यासारखा पैसा खर्च करतात आणि एखाद्या चांगल्या एजन्सीकडून बॉडीगार्ड मागवतात.
संबंधित बॉडीगार्ड त्यांचे काम चोख म्हणजे अतिशय चोखच बजावतात.
आता ही संस्कृती फोफावत आहे.
त्याच संस्कृतीचे अनुकरण काही गुन्हेगारी पार्श्वभुमीचे लोक करीत असल्याचं समोर येत आहे.

गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या वाळू व्यावसायिक संतोष जगतापला चार-चार बॉडीगार्ड ठेवण्याची गरजचं काय.
मात्र, गुन्हेगारी पार्श्वभुमी सोडून आपण समाजकारणात चांगलं काम करतोय असं दाखविण्यासाठी सोबत लवाजमा हवा.
सेलिब्रेटी सारखे आजूबाजुला बाऊन्सर (बॉडीगार्ड) ठेवून एक वेगळीच ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न संतोष जगतापने केला.
मात्र, त्याच्यासोबत असलेले बॉडीगार्ड शस्त्रधारी होते.
त्यांच्याकडील शस्त्र परवाना हा स्वःसंरक्षणासाठी आहे की व्यावसायिक हा पोलिसांच्या तपासाचा भाग आहे.
मात्र, सध्या पुण्यात अवैध खासगी बॉडीगार्डचं पेव फुटलं आहे.

काही गुंड प्रवृत्तीचे लोक हवा तेवढा पैसा खर्च करून आपल्या आजु-बाजूला अशा अवैध खासगी बॉडीगार्डचं वर्तुळचं निर्माण करून घेत असल्याचे सध्या पहावयास मिळत आहे. गुंडाने 4 बॉडीगार्ड नेमले की मग त्याचा विरोधक त्याच्यापेक्षा जास्त बॉडीगार्ड नेमतो आणि खरी खुन्नस तेथूनच सुरू होते. अखेर बेकायदेशीर पिस्तुलांचा वापर होतो अन् गोळीबारासारख्या घटना (Pune Crime) होण्यास सुरूवात होते.

हे देखील वाचा

Pune Petrol Price | ‘पेट्रोल-डिझेल’च्या दराचा दररोज नवीन ‘उच्चांक’; जाणून घ्या नवे दर

 

Shivajirao Bhosale Bank Fraud | शिवाजीराव भोसले बँक आर्थिक घोटाळा प्रकरणात साताऱ्यातून आणखी एकाला अटक

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | ‘illegal private bodyguards in Pune santosh sampatrao jagtap murder case firing in loni kalbhor police station pune police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update