Pune Crime | पतीचं जाऊबाईशी ‘लफड’ ! अनैतिक संबंध सुकर करण्यासाठी पत्नीकडे घटस्फोटाची मागणी अन् प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घरातच अनैतिक संबंध (Immoral Relations) असलेल्या पतीने परस्पर संमतीने घटस्फोटासाठी (Divorce Cases) पत्नीला प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी (Threatening To Make Private Photos Viral) दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

या प्रकरणी जनवाडीत (Janwadi Pune) राहणार्‍या एका २६ वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं.२२५/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती, जाऊ व सासूविरोधात कौटुंबिक छळाचा गुन्हा (Domestic Violence Case) दाखल केला आहे. हा प्रकार कांदिवली (Kandivali), मलकापूर (Malkapur) येथे १३ ऑगस्ट २०२० ते २० मे २०२२ दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीचे त्यांच्या जाऊबरोबर अनैतिक संबंध आहेत (Crime Against Woman). या संबंधाबाबत त्यांनी विचारणा केल्यावरुन त्यांच्याशी सतत भांडणे करुन शिवीगाळ व मारहाण करीत होते. फिर्यादी यांनी परस्पर संमतीने घटस्फोट द्यावा, नाही तर त्यांचे प्रायव्हेट फोटो व्हायरल करेल, अशी धमकी पतीने दिली. तसेच सासूने फिर्यादीसोबत भांडण करुन शिवीगाळ करुन व टोमणे मारुन मानसिक व शारिरीक छळ (Mental And Physical Abuse)केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Immoral Relations Husband Wife Divorce Cases Threatening To Make Private Photos Viral Chaturshringi Police Station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त