Pune Crime | कुख्यात कल्याणी देशपांडेला 7 वर्षांची सक्तमजुरी, 10 लाखांचा दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील वेश्या व्यवसायाच्या (Prostitution) माध्यमातून आपले आर्थिक बस्तान बसवणाऱ्या व संघटितपणे गुन्हेगारी करणाऱ्या कुख्यात कल्याणी देशपांडेसह (Kalyani Deshpande) दोघांना 7 वर्ष सक्तमजुरी (Punishment of Hard Labour) आणि दहा लाखांचा दंड ठोठावला आहे. महत्त्वाचे म्हणजे पिटा (Pita Act) आणि मोक्काच्या (Mocca) गुन्ह्यात झालेली ही पहिलीच शिक्षा असल्याचे (Pune Crime) बोलले जात आहे.

सरकारी वकील विजय फरगडे (Public Prosecutor Vijay Fargade) यांनी या प्रकरणात युक्तीवाद करताना दोघांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली होती. सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने कुख्यात कल्याणी देशपांडेसह दोघांना ही शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास निवृत्त सहायक पोलीस आयुक्त नितीन भोसले पाटील यांनी केला होता.

 

पुणे शहरातील कोथरुड भागात एका सोसायटीत वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या कल्याणी देशपांडेला ऑगस्ट 2016 मध्ये अटक (Arrest) केली होती. तिच्याविरुद्ध पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात वीस गुन्हे (FIR) दाखल होते. तिच्या तडीपारीची देखील कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास निवृत्त सहायक पोलीस आयुक्त नितीन भोसले पाटील यांनी केला होता.

कोण आहे कल्याणी देशपांडे ?

पुणे शहरात संघटीतपणे वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणी कल्याणी देशपांडे हिच्यावर संघटित गुन्हेगारी
कायद्यांतर्गत कारवाई केली होती. शहरातील चतु:श्रृंगी, कोथरुड, विश्रांतवाडी, हिंजवडी पोलीस ठाण्यात
तिच्यावर 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. ऑगस्ट 2016 मध्ये तिला अटक करण्यात आली असून ती सध्या येरवडा कारागृहात आहे.

Web Title :- Pune Crime | kalyani deshpande sent in prision for seven year under mocca and pita act pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MPSC Students Protest in Pune | पुण्यात MPSCचे विद्यार्थी आक्रमक; आंदोलन करत केल्या ‘या’ मागण्या

Sunny Leone | ‘या’ कारणामुळे आता दीपिका पाठोपाठ ‘ही’अभिनेत्री देखील होत आहे ट्रोल

Jayant Patil | ‘…हे ट्विट नक्की कोणी केले? पायउतार होण्यापूर्वी काय तो निकाल द्या’ – जयंत पाटील