Pune Crime | मुलीच्या लग्नासाठी जमवलेल्या पैशांवर आणि दागिन्यावर चोरट्याचा डल्ला; ‘खडक’ पोलिसांची ‘कडक’ कारवाई, 5 तासात आरोपी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मुलीच्या लग्नासाठी (wedding) जमवलेले पैसे आणि दागिने (jewelry) घरातील एका डब्यात ठेऊन देवदर्शनासाठी गेल्यानंतर चोरट्यांनी त्यावर डल्ला (Stolen) मारला. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) गंज पेठ येथे घडला. चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खडक पोलिसांनी (khadak police station)  कोणताही पुरावा नसताना अवघ्या पाच तासात आरोपीला गजाआड करुन गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मुलीच्या घरच्यांनी पोलिसांचे आभार मानले.

 

आकाश संजय भोरे Aakash Sanjay Bhore (वय-23 रा. नवीन म्हाडा कॉलनी, रामटेकडी, हडपसर) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी व्यंकटेश शिमाप्पा पल्ला Venkatesh Shimappa Palla (वय-40 रा. महात्मा फुलेवाडा शेजारी, गंज पेठ, पुणे) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर मारामारी आणि विना परवाना शस्त्र बाळगण्याचे गुन्हे दाखल आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचे लग्न अवघेकाही दिवसांवर येऊन ठेपले आहे. घरात लगीन घाई सुरु असताना रविवारी (दि.12) घरातील सर्वजण नवरी मुलीला घेऊन देवदर्शनासाठी तुळजापूर (Tuljapur) येथे गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन आरोपीने फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. लग्नासाठी जमवलेली रोख रक्कम आणि दागिन घेऊन आरोपीने पोबारा  केला. (Pune Crime)

सोमवारी सकाळी शेजाऱ्यांनी पल्ला यांना फोन करुन घर उघडे असल्याची आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याची माहिती दिली. त्यावेळी पल्ला यांनी स्वयंपाक घरातील कडीच्या डब्यात पैसे आणि दागिने आहेत का हे तपासण्यास शेजाऱ्यांना सांगितले. त्यावेळी डब्याची कडी तुटलेली असून त्यामध्ये पैसे नसल्याचे पल्ला यांना सांगण्यात आले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला.

 

पल्ला यांनी पुण्यात (Pune Crime ) येऊन खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास पथकाने आरोपीचा शोध सुरु केला.
कोणताही पुरावा नसताना आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
दरम्यान पोलीस अंमलदार संदिप तळेकर (Sandeep Talekar) व रवी लोखंडे (Ravi Lokhande) यांना आरोपी शंकरशेठ रोडवर (Shankarsheth Road) येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून 6 तोळ्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 4 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे (DCP Priyanka Narnaware),
सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर (ACP Satish Govekar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Senior Police Inspector Shrihari Bhairat),
पोलीस निरीक्षक गुन्हे हर्षवर्धन गाडे (Police Inspector Harshvardhan Gade),पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे (PSI Rahul Khandale), शंकर कुंभारे (PSI Shankar Kumbhare),
पोलीस अंमलदार अजीज बेग, संदिप पाटील, संदिप तळेकर, रवी लोखंडे, विशाल जाधव, राहुल मोरे, कल्याण बोराडे,
हिंमत होळकर, नितीन जाधव, प्रवीण गव्हाणे, सागर घाडगे, किरण शितोळे, महेंद्र पवार यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | khadak police station arrest criminals within 5 hours only

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Urfi Javed | उर्फी जावेदनं कॅमेऱ्या समोरच बंद केलं ‘पॅन्ट’चं बटन; नेटकरी म्हणाले – ‘काय दाखवतेस?’

Ankita Lokhande | फेऱ्यांच्या वेळी प्रचंड सुंदर दिसत होती अंकिता लोखंडे, पाहा हळद-मेहंदीपासून फेऱ्यांपर्यंत

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’च्या रुग्ण संख्येत वाढ, गेल्या 24 तासात 929 जणांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी