Pune Crime | पुण्यातील 15 वर्षाच्या मुलीला पळवून नेऊन मंदिरात लग्न; गर्भवती राहिल्यावर सोडले घरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आपल्यापेक्षा निम्म्याने लहान असलेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. तिच्याबरोबर मंदिरात लग्न केले. त्यानंतर ती गर्भवती राहिल्यावर तिला माहेरी आणून सोडून तो निघून गेला. शेवटी या अल्पवयीन मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. (Pune Crime)

याप्रकरणी खडकी पोलिसांनी (Khadki Police Station) अनुराग मनोज होळकर Anurag Manoj Holkar (वय ३०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी खडकीतील एका ३५ वर्षाच्या महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सप्टेंबर २०२० मध्ये घडली होती. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीबरोबर अनुराग होळकर याने प्रेमसंबंध निर्माण केले. तिला लग्नाचे आमिष दाखवून सप्टेंबर २०२० मध्ये रेल्वेने अहमदनगर येथे पळवून नेले. तेथून एका गावात जाऊन तेथे एका मंदिरात तिच्याशी लग्न केले. तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध केले. त्यातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर तिला २३ जानेवारी २०२२ रोजी फिर्यादी यांच्या घरी आणून सोडले. त्यानंतर तो निघून गेला तो परत आला नाही. तो नेमका कोठे राहतो, याची काहीही माहिती फिर्यादी व तिच्या मुलीला नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक भाबड अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Khadki Police registered rape case on Anurag Manoj Holkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’