Pune Crime | 20 कोटीच्या खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण ! कुख्यात गुंड गज्या मारणेच्या टोळीतील सचिन उर्फ पप्पू घोलप, अमर किर्दत, हेमंत पाटीलसह चौघांना खंडणी विरोधी पथक-2 कडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शेअर ट्रेडिंगच्या (Share Trading Business) व्यवसायत गुंतविलेल्या 4 कोटी रुपयांच्या बदल्यात 20 कोटींची मागणी (Extortion Case) करुन व्यावसायिकाचे अपहरण (Kidnapping Case) करुन खोटा बलात्काराचा (Rape Case) गुन्हा दाखल करण्याची धमकी (Threat Call) देऊन बेदम मारहाण केली. तसेच कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुख्यात गुन्हेगार गज्या मारणे (Gangster Gajanan Marne) याच्यासह 10 ते 12 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून चार जणांना गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक – 2 ने (Anti Extortion Cell, Pune) बेड्या ठोकल्या आहेत. फिर्यादी यांचे शुक्रवारी (दि.7) कात्रज येथील आय.सी.आय.सी.आय बँकेसमोरुन अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी दोन पथके तयार करुन 4 आरोपींना अटक करुन अपहरण झालेल्या व्यक्तीची सुखरुप सुटका केली.

 

गजानन (गज्या) पंढरीनाथ मारणे Gajanan Pandharinath Marne (रा. हमराज चौक, शास्त्रीनगर, कोथरुड) व त्याचे इतर साथिदार रुपेश कृष्णराव मारणे Rupesh Krishnarao Marne (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), सचिन उर्फ पप्पू दत्तात्रय घोलप Sachin alias Pappu Dattatray Gholap (रा. गोविंदराव पाटील नगर, धनकवडी), अमर शिवाजी किर्दत Amar Shivaji Kirdat (रा. एम.आय.डी.सी. कोडोवली ता. सातारा), हेमंत बालाजी पाटील Hemant Balaji Patil (रा. बुरली ता. पलूस, जि. सांगली), फिरोज महंमद शेख Feroze Muhammad Shaikh (रा. समर्थ नगर, कडोवली, ता. जि. सातारा), एक अनोळकी महिला व त्यांचे इतर तीन ते चार साथीदार यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) IPC 394, 364(A), 386, 387, 388, 120 (B) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या सचिन उर्फ पप्पू दत्तात्रय घोलप, अमर शिवाजी किर्दत, हेमंत बालाजी पाटील, फिरोज महंमद शेख यांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनने अटक केली आहे. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव हे करीत आहेत.

गुन्ह्यातील आरोपी गज्या मारणे व इतर आरोपींवर पुणे शहर, पुणे जिल्हा व इतर जिल्ह्यात खून (Murder), खूनाचा प्रयत्न (Attempted Murder), अपहरण करुन खंडणी उकळणे, दरोडा (Robbery), गर्दी मारामारी करुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकासन करणे, पिस्टल (Pistol) बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापैकी गज्या मारणे याच्यावर 31 गुन्हे, रुपेश मारणे याच्यावर 15 गुन्हे, सचिन घोलप याच्यावर 8 गुन्हे, हेमंत पाटील याच्यावर 5 तर अमर किर्दत याच्यावर एक गुन्हा दाखल आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare),
गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Unit 5 Police Inspector Hemant Patil),

सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajjanne), शैलजा जानकर (API Shailaja Jankar),
पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव (PSI Mohandas Jadhav), श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan),
अविनाश लाहोटे (PSI Avinash Lahote), पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे,
राहुल उत्तरकर, विनोद साळुंके, अनिल मेंगडे, प्रमोद टिळेकर, संग्राम शिनगार, सचिन अहिवळे, सैदोबा भोजराव,
सुरेंद्र साबळे, अमोल पिलाणे, चेतन आपटे, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, सुरेंद्र साबळे, विनोद शिवले,
अकबर शेख पवन भोसले, रवि सपकाळ व महिला पोलीस अंमलदार आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Kidnapping of businessman for ransom of 20 crores! Anti-Extortion Cell-2 arrests Sachin alias Pappu Gholap, Amar Kirdat, Hemant Patil from the gang of notorious gangsters Gajanan Marne Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dhanushyaban Symbol | ‘जनतेसोबत सैनिक गेले, इतके अनर्थ…’, धनुष्यबाण चिन्हावरुन भाजपचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

IPS Rashmi Shukla | रश्मी शुक्लांची महाराष्ट्रात महत्त्वाच्या पदावर होणार नियुक्ती?

MP Supriya Sule | ‘हम बेवफा हरगीज ना थे, पर…’ सुप्रिया सुळेंचा टोला, म्हणाल्या-‘मला शिंदे गटाची काळजी वाटते’