Pune Crime | भांडणाच्या रागातून केला खून; आरोपीला दोन तासात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भांडणाच्या रागातून तरुणाला बोलावून मारहाण (Beating) करुन खून (Murder In Pune) करणाऱ्या गुन्हेगारांना येरवडा तपास पथकाने (Pune Police) दोन तासात अटक (Arrest) केली. शहानवाज शब्बीर शेख Shahnawaz Shabbir Shaikh (वय २२, रा. टिंगरेनगर) पुणे असे अटक केलेल्याचे नाव आहे. इंजमाम जुबेर इद्रीसी Inzamam Zubair Idrisi (वय २२, रा येरवडा) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आहे. (Pune Crime)

 

जुन्या भांडणाच्या कारणावरुन आरोपींनी इंजमामला लोहगाव व वाघोली परिसरात नेऊन हत्याराने मारहाण करीत जखमी अवस्थेत येरवडा परिसरात सोडून दिले. गंभीर जखम झाल्यामुळे इंजमाम मृत्युमुखी पडला. याप्रकरणी गुन्ह्याच्या तपासाबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम (Senior Police Inspector Balkrishna Kadam) आणि पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे (Police Inspector Uttam Chakra) यांनी तपास पथकाला सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकातील अधिकारी उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, अमजद शेख, अनिल शिंदे व राहुल परदेशी हे खुनीचा शोध घेत असताना आरोपी इराणी मार्केट जवळ येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून शहानवाज शेख याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पूर्वीच्या भांडणाच्या रागातून तिघांनी मिळून पट्टा, दगड, काचेच्या बाटलीने इंजमामला मारहाण करून खून केला आहे. असे सांगून गुन्हा कबूल केला. (Pune Crime)

गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे करत आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (Deputy Commissioner of Police Rohidas Pawar),
एसीपी किशोर जाधव (ACP Kishore Jadhav),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम (Senior Police Inspector Balkrishna Kadam),
पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे (Sub-Inspector of Police Ankush Dombale),
प्रदिप सुर्वे, गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, पोना अमजद शेख, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे,
कैलास डुकरे, अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे यांनी केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Killed out of anger of quarrel; The accused was arrested within two hours

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा