Pune Crime | नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची पावणेदोन लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | प्रतिष्ठित कंपनीचे नाव वापरुन नोकरीचे आमिष दाखवून (Lure Of Job) एका तरुणीची पावणे दोन लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी मुकुंदनगर येथे राहणार्‍या २६ वर्षाच्या तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४२/२२) दिली आहे. त्यावर पोलिसांनी केरी कन्सल्टींग व अन्य चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२१ दरम्यान घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरी कन्सल्टिंग या कंपनी कडील मोबाईलचा वापर करुन आरोपींनी फिर्यादीस प्रतिष्ठीत कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखविले.
त्या कंपनीचे खोटे कागदपत्रे (Fake Documents) पाठवून त्यांना नोकरी देत असल्याचे भासविले.
त्यांना वेगवेगळ्या मोबाईलवरुन वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी कारणे सांगितले (Fraud Case).
त्यांना ऑनलाईन पद्धतीने टॉन्सफर करण्यास भाग पाडून फिर्यादी यांची १ लाख ७५ हजार ६२१ रुपयांची फसवणूक केली. पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Lure Of Job Cheating Fruad Case Swargate Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Goa Police Arrested NCP Student Leader Sonia Duhan | राष्ट्रवादीच्या तीन पदाधिकार्‍यांना अटक; सेना आमदारांशी संपर्क?

 

CM Eknath Shinde | राजकीय क्षेत्रात खळबळ ! CM एकनाथ शिंदेंच्या PA कडून धमकीचा फोन?,

 

Aditya Thackeray On Shivsena Rebel MLA | शिवसेनेचे बंडखोर आमदार विधान भवनात दाखल होताच आदित्य ठाकरे म्हणाले – ‘कसाबलाही असं आणलं नसेल’