Pune Crime | मोक्का गुन्ह्यातील आंदेकर टोळीच्या फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आंदेकर टोळीचा (Andekar Gang) सदस्य तसेच खुनाचा प्रयत्नातील (Attempted Murder) आणि मोक्का गुन्ह्यातील (MCOCA) Mokka फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकच्या (Crime Branch Unit One) पथकाने अटक केली. अक्षय दशरथ अकोलकर (Akshay Dasharath Akolkar) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने 24 मार्च रोजी काळेपडळ भागात त्याच्या साथिदारांसह जाऊन हातातील कोयते हवेत फिरवून दहशत निर्माण केली होती (Pune Criminals). तसेच एकावर कोयत्याने डोक्यात वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला होता. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

आरोपीने फिर्यादी व त्यांचे पती यांना ‘मला उसने दिलेले पैसे मागतो का? मी जेल मध्ये असताना माझ्या घरच्यांना त्रास देतो का? असे म्हणून डोक्यात कोयत्याने वार केले होते. आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. अक्षय अकोलकर (वय-30 रा. नाना पेठ, अशोक चौक, पुणे) याला मंगळवारी (दि.24) नाना पेठेतील (Nana Pethe) एका वाड्यातून अटक करण्यात आली. (Pune Crime)

हडपसर पोलीस ठाण्यात (Pune Police) दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्नातील गुन्ह्यातील आरोपी नाना पेठेतील एका वाड्यात एकटा राहत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलसांनी वाड्याला चारीबाजूने घेराव घालून खोलीमध्ये छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे हडपसर पोलीस ठाण्यातील गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपी अक्षय अकोलकर हा आंदेकर टोळीचा सक्रिय सदस्य असून त्याच्यावर एक खुन, तीन खुनाचा प्रयत्न, एक खंडणी (Ransom), दोन जबरी दुखापत, चार तडीपार आदेशाचा भंग असे एकूण 13 गुन्हे फरासखाना (Faraskhana police station), खडक (Khadak Police Station), समर्थ (Samarth Police Station), हडपसर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्यावर आतापर्यंत तीन वेळा मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. आरोपीला हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप भोसले (Police Inspector Sandeep Bhosale), पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni), पोलीस अंमलदार अमोर पवार, अजय थोरात, इम्रान शेख, अय्याज दड्डीकर, महेश बामगुडे, तुषार माळवदकर यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime | MCOCA Andekar Gang Pune Criminals Abscond Arrest Pune Police Crime Branch

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त