Pune Crime | पैसे देण्यास नकार देणाऱ्या मित्राचा चाकूने वार करुन खून, जुन्या जिल्हा परिषदेसमोरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मित्राने पैसे देण्यास नकार दिल्याने झालेल्या वादातून (Money Dispute) दोघांनी मित्राचा चाकूने (Knife) गळ्यावर सपासप वार करुन खून (Murder) केला. ही घटना मंगळवारी (दि.24) बंडगार्डन पोलिस स्टेशनच्या हद्दीत जुनी जिल्हा परिषद (Old Zilla Parishad) समोरील फुटपाथवर घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) दोघांना वेगवेगळ्या ठिकाणावरुन अटक (Arrest) केली आहे. आरोपी आणि मयत यांच्या मद्यपान (Alcoholism) केल्यानंतर पैशांवरुन वाद (Pune Crime) झाले होते.

 

संजय (Sanjay) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर प्रभातकुमार कमलाकर म्हस्के Prabhatkumar Kamlakar Mhaske (वय-36 रा. सोलापूर-Solapur) आणि निलेश बाळासाहेब भोसले Nilesh Balasaheb Bhosale (वय-25 रा. वेल्हे, शिवापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. आरोपींवर यापूर्वी तीन गुन्हे (FIR) दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक सुनिल रणदिवे (PSI Sunil Ranadive) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत हे तिघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तिघे मिळेल ते काम करुन फुटपाथवर (Sidewalk) राहतात. सोमवारी प्रभातकुमार याला केटरींगच्या कामाचे 1600 रुपये मिळाले होते. तिघांनी एकत्र रात्री दहा वाजता मद्यप्राशन केले. त्यानंतर ते रेल्वे स्थानकाकडे जात असताना संजय याने प्रभातकुमार याच्याकडे पैशाची मागणी केली. परंतु पैसे संपल्याने त्याने पैसे देण्यास नकार दिला. यावरून त्यांच्यात वाद झाला. याच वादातून दोघांनी संजय याच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासले.
त्यावेळी मृत व्यक्ती व दोघे आरोपी एकत्र जात असल्याचे दिसून आले.
आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता,
दारु पिल्यानंतर झालेल्या वादातून दोघांनी चाकूने गळा कापून खून केल्याची कबुली दिली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | money dispute murder case pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mumbai Crime | 40 वर्षाच्या प्रेयसीसोबत झोपलेल्या 61 वर्षाच्या प्रियकरचा मृत्यू, मुंबईतील धक्कादायक घटना

 

MSEDCL SMS Alert | वीजग्राहकांची बनावट SMS द्वारे आर्थिक फसवणूक ! वैयक्तिक मोबाईल क्रमांकाच्या मेसेजला प्रतिसाद देऊ नका – महावितरण

 

Tata Group | रू. 1170 वर जाईल टाटा ग्रुपचा ‘हा’ शेअर, आता डाव लावल्यास होईल जबरदस्त नफा, एक्सपर्ट म्हणाले – ‘खरेदी करा’